Karan Mehra and Nisha Rawal 
मनोरंजन

'..म्हणून मी घरातील सर्व कॅमेरे बंद केले'; निशाची कबुली

निशाने घरातील कॅमेरे बंद केल्याचा आरोप करणने केला होता.

स्वाती वेमूल

अभिनेत्री निशा रावलने Nisha Rawal पती करण मेहरावर Karan Mehra कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर ३१ मे रोजी त्याला अटक करण्यात आली. 'करणने माझा गळा आवळून डोकं भिंतीला आपटलं,' असा आरोप निशाने केला होता. दुखापतीचे फोटोसुद्धा तिने माध्यमांसमोर दाखवले होते. जामिनावर सुटल्यानंतर करणने निशावर काही प्रत्यारोप केले. निशाने घटनेच्या आधीच घरातील कॅमेरे बंद करून ठेवल्याचा आरोप त्याने केला. त्यामुळे सत्य काय आहे हे कोणाला कळूच शकलं नाही, असं तो म्हणाला. याप्रकरणी आता निशाने घरातील कॅमेरे बंद केल्याचं कबूल केलं आहे. निशा-करणच्या 4BHK घरात सात कॅमेरे आहेत. बेडरुम वगळता सर्व ठिकाणी कॅमेरे असल्याचं तिने स्पष्ट केलं. (Nisha Rawal reveals why she switched off cameras inside her house with Karan Mehra)

याबद्दल एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला होता, 'हॉलमधील कॅमेरामध्ये घडलेली घटना कैद झाली असती. मात्र निशाने ऐनवेळी तो कॅमेरा बंद केला होता. जर घटनेचं फुटेज असतं, तर सत्य सर्वांसमोर आलं असतं. मात्र सर्व कॅमेऱ्यांचं मुख्य स्विच निशाने बंद करून ठेवलं होतं. हा सर्व कट आधीच रचलेला आहे, असं मला वाटतंय.'

करणच्या आरोपांवर काय म्हणाली निशा?

'होय, घरातील कॅमेरे बंद होते आणि त्यांना काही दिवसांपूर्वीच मी बंद केलं होतं. कॅमेरा चालू असता करण माझ्यासोबत आणि मुलासोबत खूप चांगला वागत होता आणि जिथे कॅमेरा नाही, तिथे बेडरुममध्ये तो मला मारत असे. त्यामुळे मी सर्व कॅमेरे काही दिवसांपूर्वीच बंद केले. आता पोलिसांनी डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर जप्त केला आहे, त्यामुळे त्यात सर्वकाही रेकॉर्ड झालं असेल.'

२०१२ मध्ये करण आणि निशाने लग्न केलं. गेल्या चौदा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना ओळखतात आणि त्यांना चार वर्षांचा कविश हा मुलगा आहे. ३१ मे रोजी करणला अटक झाल्यानंतर या दोघांमधील वाद माध्यमांसमोर आले. करण-निशाने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचंही समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW: स्मृती मानधनाचं पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध आक्रमण, शतक हुकलं, पण रचले तीन वर्ल्ड रेकॉर्ड

Boat Accident: गुरांसाठी चारा आणण्यास १४ गावकरी गेले; पण परतताना बोट उलटली अन्...; होत्याचं नव्हतं झालं, घटनेनं हळहळ

Short film Oscar: कराड ‘कृष्णा मेडिकल’च्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर आंतरराष्ट्रीय मानांकनाची मोहोर; देहदानावरील लघुपटाला ‘ऑस्कर’चे कोंदण

DMart Sale : वीकेंड संपताच डीमार्टमध्ये नवा सेल; 'या' वस्तू झाल्या आणखी स्वस्त, 70% पेक्षा जास्त डिस्काउंट, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: आयुक्तांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पोहोचले

SCROLL FOR NEXT