Nitesh Tiwari's Ramayana Lara Dutta, Bobby Deol To Play Kaikeyi, Kumbhkaran SAKAL
मनोरंजन

Ramayana: लारा दत्ता कैकेयी तर बॉबी देओल तिवारींच्या 'रामायण' सिनेमात साकारणार ही भूमिका

रामायणमध्ये लारा होणार कैकेयी तर बॉबी साकारणार ही भूमिका

Devendra Jadhav

Nitesh Tiwari Ramayana News: नितेश तिवारींच्या आगामी 'रामायण' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि केजीएफ स्टार यश दिसणार आहेत.

हळूहळू सिनेमातील व्यक्तिरेखांमध्ये कोणते कलाकार दिसणार याचा उलगडा होतोय. अशातच सिनेमातील आणखी दोन कलाकारांच्या नावाचा खुलासा झालाय.

दिग्दर्शक नितेश तिवारी सध्या अभिनेत्री लारा दत्तासोबत कैकेयीचे पात्र पडद्यावर साकारण्यासाठी चर्चेत आहेत. याशिवाय रावणाचा भाऊ कुंभकर्ण साकारण्यासाठी बॉबी देओलशी चर्चा सुरु असल्याचं समजतंय.

पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि बॉबी देओल या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

नितेश तिवारीच्या रामायणात कोण दिसणार?

पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, नितेश तिवारी रामायणमध्ये कैकेयीची भूमिका करण्यासाठी लारा दत्तासोबत चर्चा करत आहे. नितेश तिवारी यांना भारतीय इतिहासातील कालातीत रामायणसाठी योग्य कलाकारांना कास्ट करायचे आहे.

राजा दशरथाची तिसरी पत्नी, राजकुमारी कैकेयीची भूमिका साकारण्यासाठी लारा दत्ता परिपूर्ण आहे, असे त्यांना वाटते. याशिवाय अॅनिमल फेम लॉर्ड बॉबी कुंभकर्ण साकारणार असल्याचं समजतंय.

सनी देओल होणार रामायणाचा भाग?

दरम्यान, भगवान हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलसोबत चर्चा सुरू आहे. फक्त नितेश तिवारीच नाही, तर रणबीर कपूरही सनी देओलला हनुमानाच्या भूमिकेत सामील करून घेण्यास उत्सुक आहे.

याआधी दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका अजरामर केली होती. त्याच पद्धतीने सनी सुद्धा हनुमानाची भूमिका प्रभावीपणे साकारेल असा सर्वांना विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT