not only srk hrithik roshan also do cameo in tiger 3 salman khan katrina kaif diwali 2023  SAKAL
मनोरंजन

Tiger 3 Hrithik Roshan: दिवाळीचं खास सरप्राईज! शाहरुखच नाही तर हृतिकसुद्धा दिसणार 'टायगर 3' मध्ये?

टायगर 3 बद्दल मोठी अपडेट समोर आलीय. शाहरुख सोबत हृतिकही झळकणार असल्याची जोरदार चर्चा

Devendra Jadhav

Tiger 3 Updates: सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सलमान खानचा टायगर 3 पुढच्य रविवारी १२ नोव्हेंबरला प्रेक्षकांंच्या भेटीला येतोय. सलमान खान - कतरिना कैफ यांच्या प्रमुख भुमिका सिनेमात बघायला मिळत आहेत.

अशातच सलमान खानच्या टायगर 3 बद्दल एक मोठी अपडेट समोर आलीय. गेल्या अनेक दिवसांपासुन टायगर 3 मध्ये शाहरुख खान पठाणच्या भुमिकेत दिसणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण आता केवळ शाहरुख नाही तर कबीरच्या माध्यमातुन हृतिक सुद्धा टायगर 3 मध्ये झळकणार अशी शक्यता आहे. वाचा सविस्तर.

(not only srk hrithik roshan also do cameo in tiger 3 salman khan katrina kaif diwali 2023)

हृतिक कबीरच्या भुमिकेत टायगर 3 मध्ये झळकणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मनीष शर्मा दिग्दर्शित 'टायगर 3'मध्ये हृतिक रोशनही दिसणार आहे. यशराज फिल्म्स स्पाय युनिव्हर्समध्ये टायगर, पठाण आणि कबीर एकत्र दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे वॉर सिनेमानंतर हृतिक पुन्हा एकदा टायगर 3 निमित्ताने कबीरच्या भुमिकेत झळकणार आहे. यानिमित्ताने सलमान, शाहरुख आणि हृतिक एकत्र आल्यावर फॅन्स थिएटरमध्ये एकच कल्ला करणार यात शंका नाही.

टायगर 3 चा रनटाईम आणि सेन्सॉर सर्टिफिकेट

 टायगर 3च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या या अ‍ॅक्शन चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडूनही परवानगी मिळाली आहे.

त्याचबरोबर CBFC कडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महत्वाचं म्हणजे 'टायगर 3'ला CBFC ने झिरो कटसह मंजुरी दिली आहे.

यासोबत आता चित्रपटाला U/A प्रमाणपत्र देण्यात आले. हा सिनेमा 2 तास 22 मिनिटांचा आहे.

पुढच्या रविवारी टायगर 3 साठी सज्ज राहा

सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात शाहरुख खान देखील दिसणार आहे. आता हृतिसुद्धा सिनेमात झळकल्याने लोकांना दिवाळीचं खास सरप्राईज मिळेल यात शंका नाही.

'टायगर' फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. हा चित्रपट 12 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे शो सकाळी 7 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT