janhvi kapoor, gandhi - godse ek yudh, pathaan SAKAL
मनोरंजन

Gandhi - Godse Ek Yudh: पठाण नाही तर जान्हवी कपूरने गांधी - गोडसे पाहिला, हे आहे मोठं कारण

गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा २६ जानेवारीला संपूर्ण भारतभर रिलीज झालाय.

Devendra Jadhav

गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा २६ जानेवारीला संपूर्ण भारतभर रिलीज झालाय. गांधी गोडसे एक युद्ध सिनेमाशी पठाण सोबत कडवी टक्कर आहे. अनेक ठिकाणी पठाणमुळे गांधी गोडसे एक युद्ध सिनेमाला थेटर सुद्धा मिळाले नाहीत. सगळीकडे फक्त पठाणची हवा आहे. अशातच अभिनेत्री जान्हवी कपूरने पठाण न बघता गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा बघितलाय. काय आहे यामागचं मोठं कारण..

राजकुमार संतोषी यांची मुलगी तनिषा संतोषी हिने 'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. जान्हवी कपूर हि तनिषाची मैत्रीण आहे. सिनेमात तनिषाने महत्त्वाची भूमिका साकारलीये. तनिषाच्या अभिनयाचे अनेकांनी खूप कौतुक केले आहे. आता जान्हवी सुद्धा मैत्रीण तनिषाचा अभिनय पाहुन थक्क झाली आहे. जान्हवीने मीडियासमोर तनिषाच्या अभिनयाचे आणि गांधी - गोडसे एक युद्ध सिनेमाचं कौतुक केले आहे.

जान्हवी कपूर म्हणाली, 'मी तनिशाला लहानपणापासून ओळखते, पण तिचा असा अभिनय मी कधीच पाहिला नव्हता. तिच्या अभिनयात साधेपणा आहे. तनिषा मोठ्या पडद्यावर येते तेव्हा स्क्रीन व्यापून टाकते. तिच्या भूमिकेपेक्षा खऱ्या आयुष्यात ती खूप वेगळी आहे. मी तिच्यासाठी खूप आनंदी आहे. मला तनिषाचा अभिमान आहे. तिने तिच्या भूमिकेत जान ओतली आहे. मला आशा आहे की प्रेक्षकही तनिषाला भरभरून प्रेम देतील."

२६ जानेवारीला राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी - गोडसे' प्रदर्शित होतोय. याशिवाय २५ जानेवारीला शाहरुखचा पठाण सुद्धा रिलीज झालाय. एकूणच पठाण सोबत गांधी - गोडसे सिनेमाचा सामना रंगलाय. राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे एक युद्ध' सिनेमात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेंची भूमिका साकारतोय.

नथुराम गोडसे महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात, पुढे गांधींना नथुरामला भेटण्याची इच्छा असते, अशी या सिनेमाची भन्नाट कल्पना आहे. जान्हवीच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचं झालं तर जान्हवीचा 'रुही' सिनेमा काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT