om raut shared Adipurush Jai Shri Ram lyrical motion poster is goosebumps stuff prabhas sakal
मनोरंजन

Adipurush: जय श्री राम! म्हणत ओम राऊतनं शेयर केलं 'आदिपुरुष'चं दमदार मोशन पोस्टर..

अंगावर काटा आणणारं हे पोस्टर चाहत्यांना भलतच भावलं आहे..

नीलेश अडसूळ

Adipurush motion poster:: 'तान्हाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) हा सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (Adipurush) या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजन आतुरतेने वाट पाहत आहेत.

या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि एका वेगळ्याच वादाला तोंड फुटले. चित्रपटात वापरण्यात आलेले VFX आणि रावणाची भूमिका यावरून या चित्रपटाला खूप ट्रोल केलं गेलं. पण ओम राऊतनं मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चित्रपट प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरूच ठेवली.

पण आज अक्षय्य तृतीये निमित्त ओम राऊत यांन पुन्हा एकदा 'आदिपुरुष' चित्रपटाचे नवे आणि खास मोशन पोस्टर शेयर केले आहे. अंगावर काटा आणणारे हे पोस्टर प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहे.

(om raut shared Adipurush Jai Shri Ram lyrical motion poster is goosebumps stuff)

हळूहळू या चित्रपटाविषयी एक एक गोष्ट रिव्ही होत आहे. काही दिवसांपूर्वी राम नवमीचे निमित्त साधून या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते, ज्यामध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमंत यांचे दर्शन घडले.

तर हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमनाच्या भूमिकेत असलेल्या देवदत्त नागे यांचा दमदार पोस्टर आपल्या भेटीला आला. या चित्रपटाविषयी आता उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचली आहे. अशातच आज साडेतीन मुहूर्ता पैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ओम राऊतने (om raut)अंगावर काटा आणणारे मोशन पोस्टर शेयर केले आहे.

'तेरे ही भरोसे है हम.. तेरे ही सहारे.. दुविधा कि घडी मे मन तुझको ही पुकारे.. तेरे ही बल से, हे बल हमारा.. तूही करेगा मंगल हमारा.. मंत्रोसे बढकर तेरा नाम.. जय श्री राम .. ' असे या मोशन पोस्टर मधील शब्द आहेत. दमदार संगीताची जोड असलेलं हे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

हे पोस्टर शेयर करत 'जब न जा पाओ सारे धाम.. तो बस ले लो प्रभु का नाम.. जय श्रीराम' असे कॅप्शन दिग्दर्शक ओम राऊतनं दिलं आहे. हा चित्रपट 16 जून रोजी प्रदर्शित होणार असून प्रभास रामाच्या भूमिकेत आहे तर अभिनेत्री कृती सनन सीतामातेची भूमिका साकारत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT