Oscar 2023 news  esakal
मनोरंजन

Oscar 2023 : 'तुझ्या कोटवर वाघाचे चित्र का?' पत्रकाराच्या प्रश्नावर NTR चं भन्नाट उत्तर!

ऑस्कर सोहळा पार पडल्यानंतर झालेल्या एका पार्टीतील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Oscar 2023 Natu Natu Won Best Song Now Jr NTR Tiger Costume Attire : नाटू नाटू ला ऑस्कर मिळाला आणि देशभरातमध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून राजामौली यांच्या आरआऱआऱ चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती. त्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याचा बेस्ट ओरिजनल साँग या कॅटगिरीतून नॉमिनेशन देखील मिळाले होते.

ऑस्कर सोहळा पार पडल्यानंतर झालेल्या एका पार्टीतील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या व्हिडिओची सर्वाधिक चर्चा आहे. त्याच्या ड्रेसवर असलेल्या वाघाच्या चित्रानं साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एका महिला पत्रकारानं त्याला विचारलेल्या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. ऑस्कर सोहळ्यामध्ये आरआऱआऱच्या टीमच्या पेहरावाचे देखील कौतूक झाले.

Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

पारंपारिक वेशभूषा करुन यापूर्वी आरआरआरच्या टीमनं चाहत्यांचे, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ऑस्करच्या सोहळ्यातही आरआऱआच्या टीमनं साधेपणा जपत सेलिब्रेटींचे लक्ष वेधून घेतले आहे. अशातच एनटीआऱच्या कोटवरील वाघाचे चित्र हा अनेकांच्या चर्चेचा विषय होता. त्यानं तो वाघ कोटवर का लावला असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता.

माझ्यासाठी ऑस्करच्या रेड कार्पेटवर आरआरआरचा होत असलेला गौरव मोठी अभिनास्पद बाब आहे. खूप गर्वाची बाब आहे. अशावेळी मी जी वेशभूषा केली आहे त्याचे खास कारण आहे. साऊथ एशियाचा झालेला गौरव आणि त्यात कोटवरील वाघ हे सारे भारताचे प्रतीक आहे. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

तुम्ही जर आरआरआर पाहिला असेल तर तो वाघ माझ्या अंगावर धावून येतो.त्याच वाघाचा मी सामना करतो. हे माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. माझे मित्र गौरव गुप्ता यांनी हे डिझाईन तयार केले. त्याकडे अनेकांचे लक्ष गेले आहे. ही वेषभूषा परिधान करुन मी भारताचे प्रतिनिधीत्व करतो आहे.हा भारताचा पेहराव आहे. अशी प्रतिक्रिया एनटीआऱनं दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT