oscars 2022: will smith slapped chris rock  google
मनोरंजन

Oscars 2022 : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात राडा.. विल स्मिथने क्रिस रॉक च्या कानशिलात भडकवले...

ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे होस्ट क्रिस रॉक यांनी अभिनेते विल स्मिथ यांच्या पत्नीला उद्देशून विनोद केल्याने संतापलेल्या विल स्मिथ यांनी भर पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉक यांच्या कानाखाली मारली.

नीलेश अडसूळ

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या यंदाच्या ९४ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कार सोहळ्यात पारितोषिकांचे वितरण सुरु असतानाच मोठा राडा झाला आहे. हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते विल स्मिथ (will smith) याने कार्यक्रमाचे होस्ट क्रिस रॉक (chris rock) यांच्या कानाखाली मारली आहे. रॉक याने विल स्मित यांच्या पत्नीवर विनोद केल्याने विल स्मिथ यांचा संताप अनावर झाला. स्मित यांनी मंचावर येऊन रॉक यांना मारले. त्यांनतर ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे. (Oscars 2022: will smith slapped chris rock)

क्रिस रॉक याने G. I. JANE या चित्रपटावरून विल स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट स्मिथ यांची थट्टा केली. जेडाच्या 'टक्कल' असण्यावरून त्याने भाष्य केले. परंतु जेडा यांनी अलोपेसिया या गंभीर आजारामुळे केस काढले आहेत. पत्नीची चुकीच्या पद्धतीने झालेली ही थट्टा सहन न झाल्याने स्मिथ यांचा पारा भडकला आणि त्यांनी रॉक यांच्या कानाखाली मारली.

विल स्मिथ यांना 'किंग रिचर्ड' या चित्रपटासाठी नामांकन होते. किंबहुना त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला. परंतु रॉक यांच्या विनोदामुळे संपूर्ण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेल्या प्रकाराबद्दल स्मिथ आणि 'द अकादमी'ची माफी देखील मागितली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT