Panchak Marathi Movie Trailer Madhuri Dixit Shriram Nene  esakal
मनोरंजन

Panchaak Movie Trailer : 'पंचक' लागला म्हणजे घराचं काय खरं नाय! रहस्यमय, थरारक अन् उत्कंठावर्धक ट्रेलर

मराठीतला आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट पंचक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

Panchak Marathi Movie Trailer Madhuri Dixit Shriram Nene : मराठीतला आगळ्या वेगळ्या विषयावरील चित्रपट पंचक आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची जोरदार चर्चा होती. त्याच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्या घरामध्ये अचानक वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. घरातील एक एक माणूस मृत्यूमुखी पडत आहे. मात्र हे सगळं का आणि कसे होत आहे याविषयी कुणालाच माहिती नाही. सोशल मीडियावर त्याच्या व्हायरल झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने प्रस्तुत 'पंचक' या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहाताना दिसत आहेत. नुकताच 'पंचक'चा शानदार ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने या मराठमोळ्या जोडीने हा खास मराठी चित्रपट आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणला आहे. जयंत जठार, राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. राहुल आवटे यांचे लेखन असलेल्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार, याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येक जण आपापल्यापरीने यावर उपायही शोधत आहे. या सगळ्यात कोणाची सर्कस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरु आहे. आता खोतांच्या घराला लागलेले 'पंचक' कसे सुटणार, हे बघताना मजा येणार आहे. हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाबद्दल डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित नेने म्हणतात, '' यापूर्वीही आम्ही एका चित्रपटाची निर्मिती केली होती, जो ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. 'पंचक' हा आमचा पहिला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट आहे. 'पंचक' खरंतर सर्वार्थानेच खास आहे. या चित्रपटात अनेक मात्तबर कलाकार आहेत. कथा उत्तम आहे. प्रेक्षकांना आपल्या आसपास घडणाऱ्या घटना चित्रपटरूपात पाहायला अधिक आवडतात. '

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात, ‘’श्रद्धा आणि अंधश्रद्धा याविषयावर या चित्रपटातून ज्ञान देण्याचा आमचा अजिबात हेतू नाही. आम्ही फक्त एक निखळ मनोरंजन करणारी कथा प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. एका घरात एखादी घटना घडते आणि त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे आपोआपच होणारे विनोद, अशी ‘पंचक’ची संकल्पना आहे. चार्ली चॅप्लिनच्या म्हणण्यानुसार ‘लाईफ इज अ ट्रजिडी इन क्लोज अप, बट अ कॅामेडी इन लाँग शॅाट, हा चित्रपट अगदी तसाच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांनो, राज्यात ऑक्टोबरपासून १३,५६० पोलिसांची भरती! झेडपी, महापालिका निवडणुकांपूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ; पावसाळ्यानंतर होणार मैदानी चाचणी

CM Devendra Fadnavis: गोपीनाथ मुंडेंचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री फडणवीस, लातूरमध्ये पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

Panchang 12 August 2025: आज अंगारकी चतुर्थी, ‘अं अंगारकाय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

आजचे राशिभविष्य - 12 ऑगस्ट 2025

Healthy Fasting Recipe: श्रावणातील उपवासासाठी खास! झटपट, चविष्ट आणि पौष्टिक ‘साबुदाणा-राजगिरा चीला’ एकदा नक्की करून बघा

SCROLL FOR NEXT