parineeti chopra and raghav chadha
parineeti chopra and raghav chadha Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: परिणीतीने राघव चढ्ढाचा व्हिडिओ लाइक करून अफेअरच्या वृत्ताला दिला दुजोरा

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या डेटिंगच्या अफवा चर्चेत आहेत, तर ते दोघेही सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्री लवकरच राजकारणीसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्याच वेळी, लग्नाच्या जोरदार चर्चेदरम्यान, परिणीतीने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रतिक्रियेद्वारे दोघांच्या नात्याची पुष्टी केली आहे.

खरं तर, राघव चढ्ढा यांनी बुधवारी अनेक शहरांमध्ये रॅली काढली होती आणि राजकारण्याने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ देखील शेअर केला होता. व्हिडिओमध्ये राघव लोकांशी संवाद साधताना आणि त्यांच्यासोबत फोटो क्लिक करताना दिसत आहे.

मजेशीर गोष्ट अशी आहे की डेटिंग रूमर्समध्ये परिणीतीने राघव यांचा व्हिडिओ लाईक केला आहे. ज्यानंतर अभिनेत्रीने आप नेत्यासोबतच्या नात्याची पुष्टी केल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर युजर्सनीही दोघांवर कमेंट करायला सुरुवात केली आहे.

एका यूजरने लिहिले की, "राघव + परिणिती = रागनीती." दुसर्‍याने लिहिले, "लवकरच लग्न करा सर, तुम्ही दोघे खरोखरच खूप सुंदर दिसता, राघव परिणिती."

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा नुकतेच मुंबईत लंच आणि डिनर डेटवर एकत्र दिसल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या अफवा उडू लागल्या. पापाराझींनी शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये दोघेही एकत्र रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत होते.

या सगळ्या दरम्यान राघव चढ्ढा यांनी नुकतेच परिणीतीसोबतच्या रोमान्सच्या अफवांवर मौन सोडले होते. 23 मार्च रोजी राघवला त्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटींबद्दल विचारण्यात आले. यावर आप नेते म्हणाले, 'तुम्ही मला राजकारणाचे प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT