Diwali 2023 Esakal
मनोरंजन

Diwali 2023: आली माझ्या घरी दिवाळी! लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करणार 'ही' जोडपी!

या वर्षीची पहिली दिवाळी साजरी करणाऱ्या बॉलिवूड जोडप्यांवर एक नजर टाकूया.

Vaishali Patil

Diwali 2023: आज सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सर्वत्र प्रमाचे आणि आपुलकिचे वातावरण आहे. सर्व सामान्यपासून तर सेलिब्रिटीपर्यंत सर्वच दिवाळीचा सण साजरा करत आहेत. आता त्यातच बॉलिवूडमध्येही अशी काही जोडपी आहेत जी लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करणार आहे. या वर्षीची पहिली दिवाळी साजरी करणाऱ्या बॉलिवूड जोडप्यांवर एक नजर टाकूया.

कियारा अडवाणी-सिद्धार्थ मल्होत्रा

बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय आणि आवडतं जोडपं आहे कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्राने फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न केले आहे. 'शेरशाह' चित्रपटाच्या सेटवर दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली. अलीकडेच एका ग्रँड दिवाळी पार्टीत दोघेही एकत्र दिसले. कियारा आणि सिद्धार्थची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे.

स्वरा भास्कर-फहाद अहमद

स्वरा भास्कर आणि समाजवादी पक्षाचे फहाद अहमद यांनी 6 जानेवारी रोजी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत कोर्ट मॅरेज केले होते, त्यानंतर या जोडप्याने लग्नाची पार्टी दिली. स्वरा एका मुलीची आई झाली आहे. आता स्वरा आणि फवाद आपल्या लेकीसोबत पहिलीच दिवाळी साजरी करणार आहे.

पलक मुच्छाल-मिथुन

गायिका पलक मुच्छालने मिथुन सोबत लग्न केले आहे. मिथुनसोबत लग्नानंतर पलक तिची पहिलीच दिवाळी साजरी करणार आहे. नुकत्याच एका मुलाखतीत पलकने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनच्या तयारीबाबत सांगितले होते. त्यांनी महिनाभरापुर्वीच दिवाळीची तयारी सुरू आहे.

असीस कौर- गोल्डी सोहेल

गायिका असीस कौरही तिचा पती गोल्डी सोहेलसोबत तिची पहिलीच दिवाळी साजरी करण्यासाठी उत्सुक आहे. ती दरवर्षी साधेपणाने दिवाळी साजरी करायची, पण यावेळी नवीन घर आणि नवीन वातावरण आहे. पहिल्यांदाच ती आणि तिचा पती दिवाळीला पाहुण्यांना आमंत्रित करणार आहेत असं असीसने मिडियाला सांगितले.

सुनील शेट्टीची लाडकी मुलगी अथियाने जानेवारी 2023 मध्ये क्रिकेटर केएल राहुलसोबत लग्न केले. इतरांप्रमाणे आथिया आणि राहूल देखील लग्नानंतर पहिली दिवाळी साजरा करणार आहे.

साउथ अभिनेत्री हंसिका मोटवानीने सोहेल खातुरियाशी 4 डिसेंबर 2022 रोजी जयपूरमधील मुंडोटा फोर्ट येथे विवाह केला. आता हंसिका तिची पहिली दिवाळी साजरी करणार आहे.

परिणीती चोप्रा-राघव चढ्ढा

परिणीती चोप्राने सप्टेंबरमध्ये आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढासोबत लग्न केले. लग्नानंतर परि सर्व सण उत्सव साजरा करताना दिसतेय. आता ती तिच्या पहिल्या दिवाळीसाठी उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT