
भारताचा संध सध्या इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळण्यात व्यग्र आहे. या मालिकेत शुभमन गिलच्या नेतृत्वात भारताचा संघ खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना हेडिंग्लेला झाला असून त्यात भारताला ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसऱ्या सामन्यात भारताने पुनरागमन करत बर्मिंगहॅमला ३३६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली.
आता तिसरा सामना लॉर्ड्सला १० जुलैपासून सुरू होणार आहे. पण त्याआधी शुभमन गिल एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. तो आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर एकाच कार्यक्रमात स्पॉट झाले आहेत.