Pasoori fame pakistani Singer ali sethi Married Salman  esakal
मनोरंजन

Ali Sethi Marries Salman Toor : 'पसूरी' फेम गायक अलीचं बॉयफ्रेंडसोबत लग्न!

सोशल मीडियावर सर्वाधिक काळ ट्रेंडिंग असणाऱ्या पसूरी गाण्याची क्रेझ मोठी आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

युगंधर ताजणे

Pasoori fame pakistani Singer ali sethi Married Salman : ज्या गाण्यानं तरुणाईची अमाप लोकप्रियता मिळवली त्या पसूरी गाण्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. प्रसिद्ध गायक अली सेठीनं गोड बातमी दिली आहे. त्यानं लग्न केल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. असं म्हटलं जात आहे की, त्यानं त्याच्या बॉयफ्रेंडशीच लग्न केले आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक काळ ट्रेंडिंग असणाऱ्या पसूरी गाण्याची क्रेझ मोठी आहे. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता तर पसूरी गाण्याची वेगळीच झलक ही बॉलीवूडच्या एका चित्रपटामध्ये देखील दिसून आली होती. ते गाणं प्रसिद्ध गायक अरिजित सिंगनं गायलं होतं. त्यामुळे ते चर्चेतही आले होते.

Also Read - दिल्लीतल्या केवळ प्रशासकीय बदल्यांपुरतंच मर्यादित नाही, दिल्ली सेवा विधेयक. काय आहेत

भारतात युट्युबवर ज्या गाण्याला आतापर्यत सर्वाधिक चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला आहे त्यात पसूरी गाण्याचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. पसूी गाण्यातून अली सेठी लोकप्रिय झाला. आता त्यानं लग्न केल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. पाकिस्तानपासून भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अली सेठीच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय राहिलेल्या अलीनं चाहत्यांना गोड धक्का दिला आहे.

अलीनं गुपचूप लग्न केल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अलीनं सलमान तूर नावाच्या एका तरुणासोबत लग्न केले आहे. सलमान हा पेंटर असल्याची माहिती आहे. दुसरीकडे त्यांच्या लग्नाच्या बातमीनं सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण देखील आले आहे. काहींनी पाकिस्तानी गायक अली सेठीला धारेवर धरले आहे.

पाकिस्तानील कट्टर पंथीयांनी देखील अलीला ट्रोल केले आहे. पाकिस्तानमध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता नाही. त्याबद्दलचे कायदे त्यांच्याकडे खूपच कडक आहेत. पाकिस्तानी संविधान अलीच्या विरोधात असल्यानं अलीवर आता कडाडून टीका होताना दिसत आहे. गे मॅरेज हे बेकायदेशीर असून अलीनं तर सगळ्यांसमोर येऊन त्याच्या लैंगिकतेविषयी खळबळजनक खुलासा केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र गायकाकडून अधिकृतपणे लग्न केल्याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT