Pathaan Movie Sakal
मनोरंजन

Pathaan Box Office Collection: रिलीजच्या 14 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'पठाण'चाच दबदबा; 400 कोटींचा टप्पा पार

बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' या चित्रपटाने 14 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने चार वर्षांच्या ब्रेकनंतर 'पठाण' चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले आणि या चित्रपटाने इतिहास रचला. किंग ऑफ रोमान्सचा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'पठाण' रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

'पठाण'ची रेकॉर्डब्रेक कमाई सुरू आहे. 'पठाण' रिलीजच्या दोन आठवड्यात ब्लॉकबस्टर ठरला आहे. बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 'पठाण' या चित्रपटाने 14 व्या दिवशी किती कोटींची कमाई केली ते जाणून घेऊया.

जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा विक्रम करणाऱ्या शाहरुख खानच्या 'पठाण'ची दमदार कामगिरी सुरूच आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 55 कोटींचा विक्रम केला आहे. या चित्रपटाने 12 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींहून अधिक कमाई केली.

त्याचबरोबर चित्रपटाच्या 14व्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, 'पठाण'ने रिलीजच्‍या 14व्या दिवशी 7.80 कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, शाहरुख खान स्टारर चित्रपटाची एकूण कमाई आता 446.25 कोटींवर गेली आहे. यासोबतच बुधवारी हा चित्रपट 450 कोटींचा टप्पा पार करेल.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण' हा बॉलिवूडच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत 'पठाण'ने कलेक्शनच्या बाबतीत भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे चित्रपट मागे टाकले आहेत.

त्याचबरोबर 'पठाण'च्या कमाईचा वेग पाहता लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT