phillauri  mehreen pirzada- bhavya bishnoi
phillauri mehreen pirzada- bhavya bishnoi 
मनोरंजन

अनुष्का शर्मासोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री एंगेज; कॉग्रेस नेत्यासोबत झाला साखरपुडा

शर्वरी जोशी

यंदाचं वर्ष सेलिब्रिटींसाठी खास आहे. या नव्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नाची गाठ बांधली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत असल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरपासून ते वरुण धवन-नताशा दलालपर्यंत अनेकांनी लग्नगाठ बांधली आहे. यामध्येच आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील लग्नाच्या बंधनात बांधले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री  मेहरीन पीरजादा हिचा नुकताच साखपुडा सोहळा पार पडला आहे. मेहरीनने कॉग्रेस नेते भव्य बिश्नोईसोबत साखरपुडा केला असून या सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे सर्व स्तरांमधून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

मेहरीन आणि भव्य बिश्नोई यांचा अलिकडेच साखपुडा पार पडला असून या सोहळ्याचे काही फोटो फॅनपेजवर शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर मोठ्या थाटामाटात हा सोहळा पार पडल्याचं पाहायला मिळत आहे. जयपूरमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला आहे.

साखरपुड्यासाठी मेहरीन आणि भव्य यांनी मॅचिंग कपडे परिधान केले होते. यात मेहरीनने चंदेरी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तर भव्य यांनी त्याच रंगाची शेरवानी घातली होती.

भव्य आणि मेहरीन यांची लव्हस्टोरी

मेहरीन आणि भव्य बिश्नोई यांची पहिली भेट २०२० मध्ये लॉकडाउनच्या काळात झाली होती. सुरुवातीला एकमेकांसोबत असलेल्या मैत्रीचं कालांतराने प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. मेहरीनने स्वत:  सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नात्याची कबुली दिली होती.

कोण आहे मेहरीन?

मेहरीन ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने कृष्णा गाडी वीरा प्रेमा गाढा या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे २०१७ मध्ये मेहरीनने फिलौरी या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्येदेखील एण्ट्री केली आहे. तसंच लवकरच ती एफ ३ या तेलुगू चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत व्येंकटेश दग्गुबाती, तमन्ना भाटिया आणि वरुण तेज स्क्रीन शेअर करणार आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT