Adipurush trailer Twitter review: Netizens praise VFX of Prabhas and Kriti Sanon-starrer Esakal
मनोरंजन

Adipurush trailer Twitter review: रामाचा बाण सुटला, हनुमाननं गदा आपटली रावणाची लंका हलली! आदिपुरुषचा कडक ट्रेलर

Vaishali Patil

'आदिपुरुष' या बहूप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर आज धुम धडाक्यात प्रदर्शित झाला आहे. यात प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन, लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग आणि लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे.

हैदराबादमध्ये ट्रेलर लॉन्चसाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये संपूर्ण स्टार कास्ट उपस्थित होती. तसंच चाहत्यांसाठी खास स्क्रीनिंगही ठेवण्यात आलं होतं. आता ते अधिकृतपणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.

आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये चित्रपटाची कथा रामायणावर आधारित असल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात सर्वच रामायणाचं चित्र काही क्षणात तुमच्या डोळ्यासमोर येईल. प्रभू रामाचं वनवासात जाणं, सीते रावणाने अपहरण करणं, हनुमानचा सीतेचा शोध आणि सगळ्यात शेवटी लंकापती रावणाची झलक हे सगळचं तुम्हाला थक्क करुन सोडत आहे. रिलिज होण्याच्या काही तासातच या आदिपुरुषच्या ट्रेलरला 2 मिलियनहुन अधिक व्हयूज मिळाले आहेत.

सोशल मिडियावर तर राम रावण आणि सीता याच्यांनावाचे हॅशटॅगही ट्रेंण्ड करत आहेत. ट्विटरवर #AdipurushTrailer, #SaifAliKhan, #Prabhas #Ramayan असे अनेक हॅशटॅग वापरुन ट्विट पडत आहेत.

काहींनी लिहिलयं की, ट्रेलर पाहिल्यानंतर जय श्री रामचा नारा तुमच्या मुखातून नक्कीच बाहेर पडेल असं अनेकांच म्हणणं आहे. तर एकानं लिहिलयं की, अप्रतिम ट्रेलर, उत्तम जंगल शॉट्स आणि संवादांसह उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि बीजीएम चित्रपटाला वेगळ्याच स्थानावर नेलं. जय श्री रामचा जप आदिपुरुषला ऐतिहासिक ब्लॉकबस्टर बनवेल.'

अनेकांना या चित्रपटात वापरण्यात आलेलं VFX खुप आवडलं आहे. काहींना सिता मातेचा अभिनयन पाहून भुरळ पडली आहे. तर पवनपुत्र हनुमानाच्या भूमिकेत मराठमोळा देवदत्त नागे दमदार अवतारात दिसत आहे.

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरवर चाहत्यांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यांनी व्हीएफएक्स आणि सीजीआयवर टीका केली. हा चित्रपट आता 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्याआधी ट्रायबेका चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's Likely Squad For AUS Tour : सूर्यकुमार यादव IN, रोहित, विराटची एन्ट्री; जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांना विश्रांती

D-Mart Income: बापरे! डीमार्टची 'ही' फक्त तीन महिन्यांची कमाई… आकडा वाचून थक्क व्हाल

Diwali 2025: यंदा दिवाळी 20 कि 21 ऑक्टोबर? जाणून घ्या 5 दिवसांच्या दिपत्सोवसाची संपूर्ण यादी

Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकण आता नाही राहिलं, एकनाथ शिंदेंनी मोठा गळ टाकला; राजन तेलींचा शिवसेना प्रवेश

Shivkalin Wagh Nakh : कोल्हापुरात शिवकालीन वाघनखे दाखल, उद्‍घाटनासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ मिळणार का?

SCROLL FOR NEXT