Prabhas says I will get married when... sakal
मनोरंजन

प्रभासने लग्नाविषयी दिली मोठी माहिती; म्हणाला जेव्हा मी लग्न करेन..

नाविन्यपूर्ण चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटांसह अवघ्या जगभरात ख्याती पोहोचलेल्या प्रभासने आपल्या लग्नाबाबत काही खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत...

नीलेश अडसूळ

'बाहुबली' (bahubali) चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात आणि मनामनात पोहोचलेला दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (prabhas) याने सध्या बॉलिवूडही व्यापले आहेत. नुतकाच त्याचा 'राधे श्याम' (radhe shyam) हा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटातने करोना काळातही १०० कोटींहून अधिक कमाई केली. तसेच त्यांच्या ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' (aadipurush) विषयी देखील कमालीची उत्सुकता चाहत्यांच्या मनात आहेत. आणखी एक प्रश्न त्याला सातत्याने विचारला जातो. तो म्हणजे प्रभासचे लग्नाविषयी काय मत आहे. (actorprabhas) कलाकार मंडळी अशा प्रश्नांवर उत्तर द्यायला टाळाटाळ करतात. पण नुकत्याच एका मुलाखतीत त्याने लग्नाबाबत मोठी माहिती दिली आहे. (prabhas said about marriage)

प्रभास आणि अनुष्का शेट्टी हे समीकरण आता सर्वांनाच ठाऊक आहे. अनेक वर्षांपासून त्या दोघांचे नाव एकमेकांसोबत जोडले गेले आहे. पण, दोघांनीही तसे काहीही नसून कायमच या अफवांचे खंडन केले आहे. त्यांच्यामध्ये केवळ निखळ मैत्री आहे, असे ते दोघेही सांगतात. त्यामुळे मग प्रभासच्या मनात नेमके कोण आहे. तो कुणाशी आणि कधी लग्न करणार याची उत्सुकता अनेकांना आहे. म्हणून एका मुलाखतीत त्याला लग्नाविषयी विचारले गेले.

'कुठेही मुलाखतीला गेलो की मला लग्नाविषयीच प्रश्न विचारला जातो. पण या प्रश्नाचा मला राग येत नाही. कारण चाहत्यांना आपल्याविषयी जाणून घेण्यात उत्सुकता असते. त्यांचे आपल्यावर प्रेम असते म्हणून ते असं विचारतात. हा अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे. जर मी त्यांच्या जागी असतो तर कदाचित तेच केले असते,' असे प्रभास या मुलाखतीत म्हणाला.

पुढे त्याला विचारले तो सध्या लग्नाच्या विचार करत आहेस का?, त्यावर प्रभास म्हणाला, 'जेव्हा माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असेल, तेव्हा मी निश्चितपणे त्याविषयी बोलेन,' काहीसे हसून असे उत्तर त्याने दिले. असे असले तरी चाहत्यांना मात्र त्याच्या लग्नाविषयी असलेली उत्सुकता कमी झालेली नाही. सध्या प्रभास चित्रीकरणात व्यस्त असून लवकरच त्याचे काही सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT