Pranav Raorane new marathi drama tujhi majhi jodi jamli with wife amruta raorane sakal
मनोरंजन

Pranav Raorane: अभिनेता प्रणव रावराणे प्रथमच बायको सोबत रंगभूमीवर.. या नाटकात..

'तुझी माझी जोडी जमली' नाटकातून उलगडणार दोन मित्रांच्या नात्याची धमाल गोष्ट..

नीलेश अडसूळ

एक सात नमस्ते, आपण यांना पाहिलंत का?, लगे रहो राजाभाई, एक दोन तीन चार, तीन जीव सदाशिव, वाऱ्यावरची वरात, वासूची सासू यांसह अनेक नाटकांमध्ये आणि अनेक मालिकांमध्ये विनोदाची आतिषबाजी करणारा अभिनेता प्रणव रावराणे आता एका वेगळ्या नाटकातून aने काम केले आहे. विशेष म्हणजे यंदा चक्क या नाटक त्याची बायकोही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

(Pranav Raorane new marathi drama tujhi majhi jodi jamli with wife amruta raorane)

प्रणव सोबतच इरसाल अभिनेता मुकेश जाधव या नाटकात मुख्य भूमिकेत असणार आहे. तमाशात सोंगाड्या म्हणून काम करणाऱ्या दोघ मित्रांचा व्यावसायिक नाटक, चित्रपट असा अभिनेता होण्याचा प्रवास 'तुझी माझी जोडी जमली' या नाटकात पाहायला मिळणार आहे.

आनंद म्हसवेकर लिखित दिग्दर्शित या नाटकात प्रणव रावराणे, मुकेश जाधव, अमृता रावराणे, निखिला इनामदार अशी उत्तम स्टारकास्ट असून नुकतंच हे नवंकोरं नाटक रंगभूमीवर आलं आहे.

जिव्हाळा या संस्थेने नाटकाची निर्मिती केली आहे. तर शांभवी आर्टसने हे नाटक प्रकाशित केले आहे. नाटकाचं संगीत सुखदा भावे-दाबके यांनी, नेपथ्य अनिश विनय यांनी केलं आहे. विनय म्हसवेकर निर्मिती प्रमुख, गोट्या सावंत सूत्रधार आहेत.

प्रणव रावराणे आणि मुकेश जाधव यांनी अनेक नाटकं आणि चित्रपटात अभिनेता होण्याचा प्रवास, त्यांच्या काही अडचणी आणि मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमाकडे फिरवलेली पाठ, या प्रश्नांवर, प्रेक्षकांचे मनोरंजन करीत हसवता हसवता मार्मिक भाष्य या नाटकातून केले आहे. अमृता रावराणे, निखिला इनामदार यांनी त्यांना उत्तम साथ दिली आहे.

मराठी रंगभूमीवर आनंद म्हसवेकर हे महत्त्वाचं नाव आहे. यु टर्नसारखी अनेक आशयसंपन्न नाटकांचं लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. म्हसवेकर यांच्या नाटकांच्या मांदियाळीत आता "तुझी माझी जोडी जमली" या नाटकाचीही भर पडत आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना कसदार नाट्यकृतीचा आस्वाद घेता येणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने प्रणव आणि अमृता प्रथमच एकत्र भूमिका करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत कॉंग्रेस विरोधात पेटले शिंदेंचे शिवसैनिक! पृथ्वीराज चव्हाणांनी कोणतं वक्तव्य केलं होतं ?

Shashi Tharoor: पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्यावरून दाखल खटल्याच्या सुनावणीला स्थगिती; न्यायालयाकडून थरूर यांना दिलासा

Pune Rains : पुणे जिल्ह्यातील धरणांवर २४ तास कार्यरत यंत्रणा; पूरस्थितीवर अधिकारी सज्ज

'आणि काय हवं' नंतर उमेश-प्रिया हटके सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस ! 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर VIRAL

Pune Traffic Update : बाणेर-बालेवाडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २० ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

SCROLL FOR NEXT