prasad oak praised ravi jadhav main atal hoon pankaj tripathi piyush mishra SAKAL
मनोरंजन

Main Atal Hoon: "रवी जाधवचा आजपर्यंतचा सर्वात...", प्रसाद ओक 'में अटल हू' पाहून स्पष्टच म्हणाला

पंकज त्रिपाठींची प्रमुख भूमिका असलेला 'में अटल हू' सिनेमा रिलीज झालाय

Devendra Jadhav

Prasad Oak on Main Atal Hoon: पंकज त्रिपाठी यांचा 'में अटल हू' सिनेमा काल १९ जानेवारीला रिलीज झाला. रिलीजआधीपासूनच या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमाला पहिल्या दिवशी लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. अशातच अभिनेता प्रसाद ओकने 'में अटल हू' बद्दल त्याचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाला प्रसाद? बघूया.

प्रसाद ओकचं 'में अटल हू' पाहून स्पष्ट मत, म्हणाला...

प्रसाद ओकने में अटल हू सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहीलंय की, "“ मैं अटल हूँ “ रवी जाधवनी आजपर्यंत अनेक उत्तमोत्तम चित्रपट केले पण माझ्यामते “मैं अटल हूँ “ हा रवीचा आजपर्यंतचा सर्वोत्तम चित्रपट आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम भट्टी जमलेली आहे.

“ पंकज त्रिपाठी “ ही आता व्यक्ती न राहता त्यांचे “ विद्यापीठ “ झाले आहे. माझ्या मते या विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम आपण “पाहिले”. पण पुन्हा एकदा “ मैं अटल हूँ “ हा अभ्यासक्रम सर्व अभिनेत्यांनी
“ धडा “ घेण्यासारखा आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पंकज सरांनी अंगीकारलेली शरीर भाषा निव्वळ अप्रतिम."

प्रसाद पुढे लिहीतो, रवी जाधव, मेघना जाधव आणि पंकज त्रिपाठींसह संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा..!!! रवी… तुझं अजून एक NATIONAL AWARD पक्क झालं रे मित्रा…!!!

अशा शब्दात प्रसाद ओकने रवी जाधव में अटल हू सिनेमाचं कौतुक केलंय. में अटल हूच्या प्रिमियरला प्रसाद ओक बायको मंजिरीसोबत सिनेमा पाहायला गेला होता. में अटल हू प्रसाद ओकला चांगलाच आवडलेला दिसतोय.

रवी जाधव दिग्दर्शित, ऋषी विरमणी आणि रवी जाधव लिखित, भानुशाली स्टुडिओज लिमिटेड आणि लिजेंड स्टुडिओज प्रस्तुत 'मैं अटल हूं' हा सिनेमा विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली निर्मित आहेत. या सिनेमात पंकज त्रिपाठी प्रमुख भूमिकेत असून पियुष मिश्रा, अजय पूरकर हे कलाकार सुद्धा झळकत आहेत. हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार

SCROLL FOR NEXT