prasad oak shared post on anand dighe death anniversary and announce he writes a book maza anand on his dharmveer movie journey sakal
मनोरंजन

अभिनेता, दिग्दर्शक आणि आता लेखकही.. प्रसाद ओकच्या पहिल्या पुस्तकाची घोषणा..

आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकने त्याच्या 'माझा आनंद' या नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे.

नीलेश अडसूळ

prasad oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्यातही धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ''धर्मवीर'' हा चित्रपट विशेष चर्चेत राहिला. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचेही विशेष कौतुक करण्यात आले. आनंद दिघे साकारणे हे अक्षरशः शिवधनुष्य होतं, आणि ते त्याने पेललं. त्याचा 'धर्मवीर'चा सर्व प्रवास आता पुस्तक रूपात समोर आला आहे. 'माझा आनंद' या त्याच्या पहिल्या पुस्तकाची त्याने नुकतीच घोषणा केली आहे. (prasad oak shared post on anand dighe death anniversary and announce he writes a book maza anand on his dharmveer movie journey)

प्रसादने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये दोन फोटो आहेत. एका फोटोत 'माझा आनंद' या पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत आनंद दिघे यांचा फोटो दिसत आहे. या सोबत प्रसादने कॅप्शन लिहिले आहे. 'मा. दिघे साहेबांना, विनम्र अभिवादन…!!! लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!! जय महाराष्ट्र…!!!”, असे त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पुस्तकाचे प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस असून अक्षर सुलेखन सचिन गुरव यांनी केले आहे तर शब्दांकन प्रज्ञा पोवळे यांनी केले आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने प्रसादने लेखन क्षेत्रातही पदार्पण केले आहे. त्याच्या या पुस्तकात नेमकं काय असणार? ते कधी प्रकाशित होणार? याबद्दल कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. पण यामध्ये प्रसाद ओके ते आनंद दिघे यांची भूमिका हा प्रवास असेल असा अंदाज अनेकांनी लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT