Prasad Vedpathak social media influencer
Prasad Vedpathak social media influencer  esakal
मनोरंजन

Prasad Vedpathak : 'इतकी भ्रष्ट, षंढ आणि...' प्रसाद एवढा कुणावर चिडला?

युगंधर ताजणे

Prasad Vedpathak social media influencer : सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया, पोस्ट आणि रिल्स यामुळे नेहमीच चर्चेत असणारा प्रसाद वेदपाठक हा आता मोठा इन्फ्ल्युंसर म्हणून माहिती आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. सध्या तो त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला आहे.

प्रसाद वेदपाठकनं त्याच्या ट्विटरवरुन एक सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये या देशातील जनतेला भ्रष्ट आणि पंढ जनता म्हणतो आहे. यावेळी त्यानं शिवराळ भाषेचा प्रयोग आपल्या मनातील वेदना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रसादची ती पोस्ट व्हायरल होताच त्याला अशाप्रकारे बोलण्याचा काय अर्थ असेही विचारले आहे. यावर त्याच्या यापूर्वीच्या पोस्ट पाहिल्यानंतर त्याला काय म्हणायचे आहे हे लक्षात येते.

Also Read - बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

यापूर्वी देखील प्रसादनं वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रसाद आणि त्याची पत्नी दीपिका हे प्रसिका नावानं सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रिल्सला, व्हिडिओला मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. अशातच प्रसादनं केलेल्या ट्विटनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रसादनं काल ट्विट करताना लिहिलं होतं की, आज चांगल्या शाळा बनवा नाहीतर, उद्या जास्त जेल बनवावे लागतील ! याशिवाय त्यानं देशात जी महागाई वाढते आहे त्यावर देखील परखडपणे मत व्यक्त केलं होतं. तो म्हणाला होता की, सिलिंडर, पेट्रोलच्या किंमती किती वाढल्या आहेत. महागाईची कुणाला काळजी दिसत नाही. आपल्या देशामध्ये हे सगळे काय चालले आहे असा प्रश्न त्यानं उपस्थित केला होता.

त्या ट्विटच्या आधारावरच पुन्हा प्रसादनं आपला राग व्यक्त केल्याचे दिसून आले आहे. या ट्विटमध्ये त्यांचा प्रचंड संताप झाल्याचे दिसत आहे. त्यामुळेच की काय त्यानं महागाईला जबाबदार असणाऱ्या सरकारला निवडून देणाऱ्या लोकांविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. त्या ट्विटनंतर त्याला नेटकऱ्यांनी प्रश्न विचारुन हैराण केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT