prashant damle wins in Natya Parishad Election Result 2023 prasad kambli defeat sakal
मनोरंजन

Natya Parishad Election Result: नाट्य परिषद निवडणुकीत प्रशांत दामले विजयी! कांबळींचा पराभव..

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद निवडणुकीचा निकाल अखेर समोर..

नीलेश अडसूळ

Prashant damle wins Natya Parishad Election: एखाद्या राजकीय निवडणुकी इतकं महत्व प्राप्त झालेली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक अखेर काल रविवार १६ एप्रिल रोजी पार पडली. संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान सुरू होते. या निवडणुकी नंतर तातडीने मत मोजणीला सुरुवात झाली.

रात्री उशिरा पर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणी झाल्यानंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा निकाल लागला. या पंचवार्षिक निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे पारडे जड होत त्यांचा दणदणीत विजय झाला.

मुंबई मध्यवर्ती शाखेतील दहा जागांपैकी ८ जागांवर दामले यांच्या रंगकर्मी नाटक समूहाचे उमेदवार निवडून आले तर उर्वरीत दिन जागांवर प्रसाद कांबळी यांच्या आपलं पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले.

(prashant damle wins in Natya Parishad Election Result 2023 prasad kambli defeat)

यंदा दामले vs कांबळी अशी लढाई होती. त्यात यंदाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप असल्याच्या जोरदार चर्चा झाल्या. आरोप प्रत्यारोप झाले. पण अखेर दामले यांनी बाजी मारत नाट्य परिषदेवर आपला झेंडा रोवला.

मुंबई मध्यवर्तीत शाखेत एकूण १३२८ इतके मतदान झाले. त्यापैकी माटुंगा यशवंत नाट्य मंदिर येथे १२४५ आणि गिरगांव येथे ८३ मतदान झाले. तर मुंबई उपनगर शाखा (मुलुंड - बोरिवली- वसई) यांचे एकूण ७३० मतदान झाले.

दामले यांच्या 'रंगकर्मी नाटक समूहा'चा ८/२ असा विजय झाला यामध्ये प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे, सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर, वैजयंती आपटे भरघोस मतांनी विजयी झाले. तर उर्वरित दोन उमेदवार हे आपलं पॅनल मधून विजयी झाले असूनह यामध्ये स्वतः प्रसाद कांबळी आणि अभिनेत्री सुकन्या मोने विजयी झाल्या.

अ. भा. मराठी नाट्य परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२३-२८

मध्यवर्ती शाखा - विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांची आकडेवारी

१) प्रशांत दामले (७५९)

२) विजय केंकरे (७०५)

३) विजय गोखले (६६४)

४) सयाजी शिंदे (६३४)

५) सुशांत शेलार (६२३)

६) अजित भुरे (६२१)

७) सविता मालपेकर (५९१)

८) वैजयंती आपटे (५९०)

९) सुकन्या कुलकर्णी-मोने (५६७)

१०) प्रसाद कांबळी (५६५)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT