Mukta Barve,Priya Bapat
Mukta Barve,Priya Bapat Google
मनोरंजन

प्रिया बापटसोबत मुक्ता बर्वेलाही लागलं डान्सिंग रीलचं वेड...

प्रणाली मोरे

प्रिया बापट(Priya Bapat) आणि मुक्ता बर्वे(Mukta Barve) या मराठी सिनेमाला लाभलेल्या दोन गुणी अभिनेत्री. दोघींच्या अभिनयाच्या क्षमता खूप वेगळ्या,प्रत्येकीची स्वत:ची अशी खासियत. अशाच या दोन वेगळ्या अभिनयाची जातकुळी असलेल्या अभिनेत्री 'आम्ही दोघी' मध्ये एकत्र दिसल्या आणि त्यांनी प्रेक्षकांच्या थेट मनाला स्पर्श केला. दोघींनी आतापर्यंत अनेक वेगवेगळी नाटकं,मालिका,सिनेमे केले आहेत. आणि त्यांचा स्वतःचा असा चाहता वर्ग आहे. त्यात प्रिया ही नेहमीच मुक्ताच्या तुलनेत सोशल मीडियावर सुपरअॅक्टिव्ह असते. वेगवेगळे फोटो,व्हिडीओ हे तर प्रिया अपलोड करीतच असते पण आता डान्सिंग रीलही सोशल मीडियावर शेअर करून तिनं आपल्या फॅन फॉलॉइंगची यादी आणखीनंच वाढवल्याचं दिसून येतंय.

नुकतीच ती तिचा नवरा उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांच्या सोनी टि.व्ही वरील 'अजुनही बरसात आहे' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भुमिकेत दिसली होती. त्यानिमित्तानं ती सेटवर गेलेली. तेव्हा तिथले धम्माल फोटो तिने याआधी सोशल मीडियावर शेअर केलेच होते. पण आता पुन्हा तिने तिथे सेटवर जाऊन 'हवा में उड़ता जाये' च्या रीमिक्स गाण्यावर मुक्तासोबत ठेका धरत धम्माल डान्स केलाय. अर्थात याचं संपूर्ण शुटिंग तिनं आपला नवरा अभिनेता उमेश कामत कडून करवून घेतलंय. या व्हिडीओत मुक्ता आणि प्रियानं अगदी तालात नृत्य करीत कामाचा स्ट्रेस संपूर्णपणे झुगारून दिल्याचा मूड नक्कीच दिसून येतोय.

हा डान्सिंग रीलचा व्हिडीओ मुक्ता बर्वेनं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलाय. तिनं त्याला कॅप्शन दिलंय की,'पुढच्या वेळेला आपण सर्व स्टेप्स न चुकता करू सफाईदारपणे'. त्यावर प्रिया बापटनं कमेंट केलीय,'अतिशय योग्य कॅप्शन दिलंयस तू'. अभिनेत्री क्रांती रेडकरने 'हार्ट इमोजी' कमेंट बॉक्समध्ये दिले आहेत. तर एकाने लिहिलंय,'प्रिया तू मुक्तालाही वेड लावलंस डान्सिंग रीलचं'. या आणि अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर येत आहेत. असो,प्रिया खूप कठीण व्यायाम करते म्हणून ब-याच अभिनेत्री ती व्यायाम करताना तिच्यापासून एक हात लांब राहतात पण आता तिच्या डान्सिंग रीलच्या ग्रुपमध्ये मात्र हळूहळू सगळ्या सामिल व्हायला लागल्यात म्हणायचं. त्याची सुरुवात प्रियानं मुक्तापासून केलीय म्हणायची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

SCROLL FOR NEXT