priyamani
priyamani  Team esakal
मनोरंजन

प्रिय'मनी' च्या पर्समध्ये शाहरुखनं दिलेले 300 रुपये

युगंधर ताजणे

मुंबई - द फॅमिली मॅन सीझन 2 (the family man season 2) चा प्रभाव अद्याप प्रेक्षकांच्या मनावर आहे. त्या मालिकेतील कलाकार, संवाद, कथा, दिग्दर्शन याची सतत चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत ही मालिका चर्चेत आहे. त्यातील कलाकारांच्या बाबत सांगायचे झाल्यास त्यांनाही या मालिकेनं लोकप्रियतेच्या एका शिखरावर नेले आहे. प्रियामणी (priyamani) ही या सिरिजमधील अभिनेत्री तिच्या प्रतिक्रियेमुळे चर्चेत आली आहे. (priyamani said shahrukh khan had given 300 rupees during the film chennai express)

प्रियामणीनं एका मुलाखतीमध्ये असे सांगितले, चेन्नई एक्सप्रेसमधील (chennai express) 1234 गाण्याच्या शुटिंगच्या वेळी शाहरुख खाननं आपल्याला तीनशे रुपये दिल्याची आठवण तिनं सांगितली आहे. विशेष म्हणजे तिनं हे पैसे जपून ठेवले आहे. प्रियमणीच्या या आठवणीला तिच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. त्यांनी तिला लाईक्स आणि कमेंटही केल्या आहेत. प्रियमणि दाक्षिणात्य चित्रपट विश्वामध्ये प्रसिध्द असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॉलोअर्सही मोठा आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (social media active) असणारी सेलिब्रेटी म्हणूनही तिची ओळख आहे. फॅमिली मॅनच्या पहिल्या भागातही प्रियमणिनं प्रभावी भूमिका केली होती. दुस-या भागातल्या तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनपूर्वक दाद दिली आहे. साधारण तीन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मालिकेची लोकप्रियता अजूनही कायम आहे. सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटूंबात घडणारी ही कथा अनेकांना कमालीची आवडली आहे.

प्रियामणिनं चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुखसोबत 1234 गेट ऑफ द डान्स फ्लोअर या गाण्यावर डान्स केला होता. त्यावेळी तिला शाहरुखनं 300 रुपये दिल्याची आठवण प्रियमणिनं सांगितली आहे. तिनं अजूनही ते पैसे सांभाळून ठेवले आहेत. प्रियामणि त्या आठवणीबाबत सांगते, त्या गाण्याचे पाच दिवस शुटिंग चालले होते. मात्र तो अनुभव खूप काही शिकवणारा होता.

शाहरुख बरोबर काम करणं हा आनंददायी अनुभव होता. आम्ही शुटिंगच्या वेळी एक सहकलाकार म्हणून काम केले. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही अनेकदा त्यांच्या आयपॅडवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचा भागही झालो आहोत. त्यावेळी मला त्यांनी दिलेले तीनशे रुपये अद्याप माझ्या पर्समध्ये आहेत. असंही प्रियामणिनं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT