Priyanka Chopra Met Gala 2023 Esakal
मनोरंजन

Priyanka Chopra: एक नंबर जोडी! देसी गर्लनं नवऱ्यासोबत Met Gala 2023 फॅशन शोमध्ये केली हवा...

Vaishali Patil

मेट गाला 2023 न्यूयॉर्क शहरात सुरू झाला आहे. बॉलीवूडपासून बॉलिवूडपर्यंत, जगभरातील बड्या सेलिब्रिटींनी मेट गाला २०२३ च्या रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवली आहे. मेट गालामध्ये सेलिब्रिटींचे रंगीत आणि वेगवेगळ्या पोशाखांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट आणि मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी भारतातून गाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पोहोचल्या.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने पती निक जोनाससोबत या फॅशन शोला हजेरी लावली. या प्रसिद्ध फॅशन शोच्या रेड कार्पेटवर दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे घातले होते. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडिओचा व्हायरल झाले आहे.

काही वर्षांपूर्वी दोघेही याच फॅशन शोच्या रेड कार्पेटवर भेटले होते. असंही नेहमी बोललं जाते. दोघांना एकत्र पाहिल्यानंतरच त्यांच्या अफेअरची बातम्या रंगल्या होत्या.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने न्यूयॉर्क शहरात आयोजित मेट गालामध्ये पती निक जोनाससोबत जेव्हा एन्ट्री केली त्यावेळी सर्वांच्या नजरा या जोडप्यांवर खिळल्या होत्या. यावेळी कपलने ब्लॅक अँड व्हाईट अशा थीमचे पोशाख निवडले होते, ज्यामध्ये दोघेही खुपच स्टनिंग दिसत होते.

यात प्रियांकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर तिने काळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. पांढऱ्या रंगाचे फ्रिल स्लीव्हज या हाय स्लिट गाऊनमध्ये तिचं सौदर्य खुपच वाढले होते. देसी गर्लने तिचा मेट गाला लुकमध्ये न्यूड मेकअप आणि स्मोकी डोळ्यांच्या मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केला. डायमंड नेकपीस आणि ज्वेलरी आणि काळ्या हाय हिल्समध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. यावेळी निक अन् प्रियंकाच्या जोडीनं खुपच हवा केली.

मेट गाला दरवर्षी आयोजित केला जातो जो जगातील सर्वात प्रतिष्ठित फॅशन इव्हेंटपैकी एक आहे. यावेळी मेट गाला 2023 ची थीम दिवंगत फॅशन डिझायनर कार्ल लेजरफेल्ड यांना समर्पित आहे. त्याला 'कार्ल लेजरफेल्ड - अ लाइन ऑफ ब्युटी' असं नाव देण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : दुकाने फोडणारा परराज्यातील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT