priyanka 
मनोरंजन

विदेशी बहुचा ढिंचॅक अवतार, नेटकऱ्यांनाही हसू आवरेना...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बी टाऊनमधले कलाकार कोणते कपडे परिधान करतात, काय हेअरस्टाईल करतात, त्यांची फॅशन याकडे साऱ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. तरुणवर्ग तर या मंडळींना फाॅलो करत आपली फॅशन ठरवतात. पण काही वेळा सेलिब्रेटी त्यांच्या फॅशनमुळे ट्रोल देखील होतात. आपल्या आवडत्या कलाकाराचा एखादा लूक आवडला नाही की सोशल मीडियावर अगदी कमेंट्सचा पाऊस पडतो. आत हेच बघा ना देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच तिच्या फॅशनच्या बाबतीत वेगवेगळे प्रयोग करत असते. बऱ्याचदा तिला तिच्या कपड्यांवरून ट्रोल केलं जातं. आता तर ती तिच्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहे.

प्रियांका सध्या परदेशात आपला पती निक जोनासबरोबर एकत्रित वेळ घालवत आहे. शिवाय सोशल मीडियावर हजारो पोस्ट ती शेअर करतच असते. नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला यामध्ये ती बाथरोबच्या पोशाखात डान्स करताना दिसत आहे. तिचा डान्स जरी वाईट नसला तरी तिने केलेली हेअरस्टाईल काही तरी भलतीच आहे. प्रियांकाचे संपूर्ण केस यामध्ये उभे राहिलेले आहेत. तिचा हा ढिचॅंक अवतार पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरलेलं नाही.

या व्हिडिओ शेअर करताना पीसीने 'डान्सिंग इन्टू द विकेण्ड' अशी कॅप्शन दिली आहे. प्रियांकाने तिच्या स्टाईलच्या बाबतीत केलेला हा नवा प्रयोग तिच्या चाहत्यांना अजिबात आवडलेला नाही. आणि म्हणूनच लगेचच तिला ट्रोल करायला सगळ्यांनी सुरुवात केली. प्रियांका हे नक्की काय आहे? अशी कमेंट अनेकांनी केली आहे. तर काहींनी 'अरे हा तर केसांचा पर्वत' असे म्हटले आहे. एका युजरने तर चक्क कहरच केला आहे. त्याने म्हटले 'आमची प्रियांका तर हिरा होती, पण विदेशींनी तिची वाट लावली.' तिचा हा नवा लूक म्हणजे सोशल मीडियावर चर्चेचा नवीन विषय ठरत आहे.

प्रियांकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करताच लाखोंच्या घरात या व्हिडिओला व्ह्युज मिळाले आहेत. खरं तर मेट गालाला देखील प्रियांकाने अशीच चित्र-विचित्र फॅशन केली होती. तिचा मेट गालाला परिधान केलेला ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून तिचे चाहते तर संतापले होते. तिची हेअरस्टाईल पाहून हे तर चिमणीचं घरटं असे अनेकांनी म्हटले होते. मात्र या सगळ्या ट्रोलर्सना पीसी मात्र सकारात्मक रितीने घेते. हाच व्हिडिओ त्याचं एक उत्तम उदाहरण आहे.

priyanka chopra unique hair style video viral on social media

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Office: काँग्रेसला मोठा धक्का! दिल्लीतील मुख्यालय खाली करण्याचे सरकारकडून आदेश; मोठा राजकीय वाद उभा राहणार?

LPG Supply Crisis In India : एलपीजी संकटात केंद्राचा मोठा निर्णय ! PNG कनेक्शन लवकर मिळणार; आता गॅस पाईपलाइनसाठी येणार नाही अडथळा

गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज! अडकलेले पैसे लवकर परत मिळणार; महायुती सरकारकडून MPID कायद्यात मोठा बदल

कोमेजली म्हणून मी ती फुलं कचऱ्यात टाकली... नम्रता संभेरावने सांगितला मुलाचा भावुक किस्सा; म्हणाली- त्याने पाहिलं आणि...

Latest Marathi News Live Update : धाराशिवमध्ये शेतकऱ्याचा शेतातच आत्मदहनाचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT