protest against the film gandhi godse ek yudh in mumbai promotion event at press conference of Rajkumar Santoshi sakal
मनोरंजन

Gandhi Godse Ek Yudh: 'गांधी गोडसे'चित्रपटाचा वाद पेटणार! काळे झेंडे दाखवत बंद पाडला कार्यक्रम

'गांधी गोडसे'चित्रपटाला होतोय विरोध, दोन्ही विचारांचे गट आक्रमक..

नीलेश अडसूळ

gandhi godse ek yudh: सध्या बॉलीवुडमध्ये चर्चा आहे ती, राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे - एक युद्ध' या सिनेमाची. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे हे दोन विषय जेव्हा जेव्हा समोर आले आहेत तेव्हा वाद, चर्चा होणे अटळ असते. गांधींच्या मारेकऱ्याची ही गोष्ट राजकुमार संतोषी मोठ्या पडद्यावर साकारणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, या निमित्ताने आता रोज नवा वाद समोर येत आहे.

'गांधी गोडसे - एक युद्ध' हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटावरुन गांधी वादी आणि कट्टर हिंदुत्ववादी चांगलेच भडकले आहेत. गांधींना चुकीचं दाखवू नका असा रेटा गांधीवादी धरतायत तर नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपट बंद पाडू असा इशारा कट्टर हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. अशातच या चित्रपटाविरोधात नुकतच मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलं.

अंधेरी येथे ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात सात ते आठ तरुणांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांनी या वेळी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात घोषणाबाजी करून तिरंगा आणि काळे झेंडे फडकावले. पुढे विरोध इतका वाढला होता की निर्मात्यांना पोलिसांना बोलवावं लागलं.

दरम्यान, या प्रकाराबाबत राजकुमार संतोषी म्हणाले, की मी महात्मा गांधी, भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुयायी आहे आणि राहीन. आधी तुम्ही ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट पाहा आणि मला माझ्या चुका दाखवा. प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याचा गैरवापर करू नका. या चित्रपटाबद्दल मी चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT