Surbhi Jyoti Wedding: Esakal
मनोरंजन

Surbhi Jyoti Wedding: सुरभी ज्योती लवकरच म्हणणार 'कुबूल है'? कुणासोबत बांधणार लग्नगाठ?

सर्वांची लाडकी झोया म्हणजेच सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत लग्न करणार आहे.

Vaishali Patil

Surbhi Jyoti Wedding: सध्या मनोरंजन विश्वातही लगीन घाई सुरु आहे. नुकतीच आमिर खानची मुलगी आयरा खानने नुपूर शिखरेसोबत लग्न केलं तर अभिनेत्री रकुल प्रीतने देखील तिचा बॉयफ्रेंड जॅकी भगनानीसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्री नववधू होण्यासाठी तयार असल्याच्या चर्चा आहेत. ती अभिनेत्री म्हणजे कबूल है फेम अभिनेत्री सुरभी ज्योती.

सर्वांची लाडकी झोया म्हणजेच सुरभी ज्योती तिचा बॉयफ्रेंड सुमित सुरीसोबत लग्न करणार आहे. सुरभी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती तिच्या कामाव्यतिरिक्त लव्ह लाईफमुळे देखील चर्चेत राहिली आहे. सुमित सुरीपुर्वी सुरभीचे नाव अभिनेता पर्ल व्ही पुरीशी जोडले गेले होते. आता सुरभीच्या लग्नाची सोशल मिडियावर चर्चा होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरभी ज्योती सुमित सुरीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. सुमित हा बिझनेसमॅन असण्याबरोबरच अभिनेता आणि निर्माता आहे. सुरभी बऱ्याच वर्षांपासून सुमितला डेट करत आहे.

सुरभी आणि सुमित हे 6 किंवा 7 मार्चला लग्न करणार असल्याचा दावा सुरभीच्या जवळच्या मैत्रिणीने केला आहे. तिच्या लग्नात फक्त कुटुंब आणि मित्र उपस्थित राहणार आहेत

सुमित सूरीने द टेस्ट केस आणि होम सारख्या ओटीटी शोमध्ये काम केले आहे. त्याने सुरभीसोबत एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे. 2018 मध्ये त्याच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सुरभी ज्योती कुबूल है मध्ये झोयाची भूमिका साकारुन प्रसिद्ध झाली. नागिन या मालिकेत तिची आणि पर्ल व्ही पुरीची केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT