Raj Kundra Shilpa Shetty Husband Bollywood Movie  esakal
मनोरंजन

Shilpa Shetty Husband: शिल्पाच्या नवऱ्यावर पिक्चर! तुरुंगातल्या 'त्या' दिवसांची सांगणार कहाणी

गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या शिल्पासाठी तो काळ मात्र खूपच वेदनादायी होता.

युगंधर ताजणे

Raj Kundra Shilpa Shetty Husband Bollywood Movie : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या फिटनेसमुळे सोशल मीडियावर चाहत्यांच्या चर्चेचा विषय असते. आज सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रेटी म्हणून शिल्पाचे नाव घ्यावे लागेल. वयाची चाळीशी ओलांडलेल्या शिल्पानं तिच्या फिटनेसनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

बॉलीवूडपासून काही काळ लांब असलेल्या शिल्पानं वेगवेगळ्या रियॅल्टी शो मधून आपली छाप उमटवली होती. गेल्या काही वर्षांपासून लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या शिल्पासाठी तो काळ मात्र खूपच वेदनादायी होता. ज्यात तिच्या पतीला राज कुंद्राला अश्लील चित्रपट तयार करणे आणि त्या परदेशात प्रदर्शित करण्यासाठी अटक करण्यात आली होती. त्याला दोन महिन्याचा तुरुंगवासही ठोठावण्यात आला होता.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

या घटनेचे मोठे पडसाद शिल्पाच्या वैवाहिक आयुष्यावर उमटले होते. ती घटस्फोट घेणार की काय अशाही चर्चाही समोर आल्या होत्या. शिल्पानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची माफी मागून याप्रकरणात आपल्यावर प्रतिक्रिया देताना थोडी काळजी घ्यावी, संयम बाळगावा, झाल्या प्रकरणात आपली काही चूक नाही. असे सांगितले होते. आता शिल्पाच्या बाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

राज कुंद्रावर आता चित्रपट येणार असून त्यात तो स्वता मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.दोन वर्षांपूर्वी राजला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली होती. राज हा सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर असून त्याच्यावरील याचिकेची सुनावणी अद्याप कोर्टात सुरु आहे. त्या प्रकरणापासून राज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलेला सेलिब्रेटी होता.

राजवर हॉटशॉट्स नावाच्या अॅपवर अश्लील चित्रपटांची निर्मिती आणि त्याचे वितरण याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणावर राजनं काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता, एक वर्षापूर्वी मी जेलमधून बाहेर आलो होतो. मला माहिती आहे की, माझ्यासोबत न्याय होईल आणि याप्रकरणातून मी निर्दोष बाहेर सुटेल. त्यावर त्याला नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणाऱ्या होत्या.

पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्राच्या त्या ६३ दिवसांवर चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. माझ्यासोबत जे काही झाले ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राज स्वत या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing : शेअर बाजाराचा सपाट पातळीवर व्यवहार! पण Lenskart IPO ची मोठी मागणी! कोणते शेअर्स चमकले ?

Explained : ३०८ धावा अन् २ विकेट्स... तरीही प्रतिका रावलला वर्ल्ड कप विजयाचं मेडल का दिलं गेलं नाही? ICC चा नियम काय सांगतो वाचा

Frequent Urine Blockage: वारंवार थांबून थांबून लघवी होते? मग किडनी निकामी होण्यापूर्वी जाणून घ्या ही ‘धक्कादायक कारणं’!

Latest Marathi News Live Update : यश ढाका आता प्रकरणी आज बीडमध्ये जन आक्रोश मोर्चा

Luxury toilet seat : बापरे!!! एका ‘टॉयलेट सीट’ची किंमत तब्बल ८८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त

SCROLL FOR NEXT