raj kundra,shilpa shetty,reena kundra
raj kundra,shilpa shetty,reena kundra file image
मनोरंजन

राजच्या पहिल्या पत्नीबद्दल बहिण रीनानं केला खुलासा...

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(shilpa shetty) पती राज कुंद्रा(raj kundra) सध्या त्याच्या पहिल्या पत्नीमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये राजची पहिली पत्नी कविताने राजसोबत घटस्फोट घेण्यासाठी शिल्पा कारणीभूत होती अस म्हटले होते. त्यानंतर 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत राजने कवितावर मेहुण्यासोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे आरोप केला. त्यानंतर आता राजची बहिण रीना कुंद्राने एका मुलाखतीमध्ये कविताबद्दलचे तिचे मत व्यक्त केले आहे.(raj kundra sister reena tell his ex wife kavita loved her like an older sister)

रीनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'मी नेहमी कविताला मोठ्या बहिणीसारखे समजत होते. मला ती आवडत होती. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता. आमच्यामध्ये जवळचे नाते निर्माण झाले होते. मी हा विचार देखील करून शकत नाही की, ती माझ्यासोबत अशी वागेल. याने मला भावनिक धक्का बसला.' काही दिवसांपुर्वी शिल्पाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी कविताच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याबद्दल राजने एका मुलाखतीमध्ये सांगितले, 'शिल्पाच्या विरोधातील कविताची जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल झाली. मात्र त्यावर मी काहीच बोलू नये असं तिचं मत होतं. शिल्पाच्या वाढदिवसानंतर पुन्हा ती मुलाखत चर्चेत आली होती. ते वाचून माझी पुन्हा चिडचिड झाली. मला सर्व गोष्टी समोर आणायच्या होत्या, सत्य हे समोर येणारच होतं. ११ वर्षांपूर्वीच्या सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलून माझं मन फार हलकं झालं. माझ्या आईने मेहुण्याला आणि कविताला रंगेहात पकडलं होतं. दोन्ही कुटुंब उध्वस्त करताना त्यांनी एकदाही विचार केला नव्हता'

राज आणि कविता यांनी २००३ मध्ये लग्न केलं आणि लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये राजने शिल्पा शेट्टीसोबत लग्न केलं. राज आणि शिल्पाला दोन मुलं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT