shilpa shetty esakal
मनोरंजन

'पती अश्लील व्हिडिओ बनवतो, तु मंदिरात पाया पडते' शिल्पा ट्रोल

बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) ही सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची (bollywood) प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) ही सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती एका गंभीर संकटातून जात आहे. तिचा पती प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी व्हिडीओ तयार करणे आणि ते शेयर केल्याप्रकरणी अटकेत आहे. यावरुन शिल्पाला देखील मोठ्या प्रमाणात मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागले आहे. तिनं आपल्या रियॅलिटी शो मधूनही माघार घेतली होती. मात्र न्यायालयानं काही अंशी तिच्या पतीला दिलासा दिल्यानं ती पुन्हा त्या रियॅलिटी शो मध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले आहे. आता शिल्पा पुन्हा ट्रोल होण्याचे कारण म्हणजे तिनं वैष्णोदेवीच्या दरबाराला भेट दिली. तेव्हा तिला ट्रोल करण्यात आले.

मुंबई पोलिसांनी राजला अटक केली होती. त्यानंतर काही दिवसांनी शिल्पा आणि तिची सासु यांचीही चौकशी करण्यात आली होती. उत्तर प्रदेशातातील एका ठिकाणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. राजच्या सध्याच्या कारवाईविषयी सांगायचे झाल्यास त्याच्यावर दीड हजार पानांचे दोषारोप पत्र तयार करण्यात आले आहे. ते न्यायालयात सादरही करण्यात आले आहे. यासगळ्य़ात प्रकरणात आपल्याला दिलासा मिळावा म्हणून अभिनेत्री देवीच्या चरणी लीन होण्यासाठी गेली होती. मात्र तिथे तिला वेगळ्या अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. शिल्पा वैष्णवोदेवीला गेल्याचे कळताच तिचे तिथले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर ती ट्रोल व्हायलाही सुरुवात झाली.

राज आणि त्याचा मित्र रायन थॉर्प हे दोघेही अजून न्यायालयीन तुरुंगात आहे. राजला अटक झाल्यानंतर शिल्पाला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. काही माध्यमांच्याविरोधात ती न्यायालयात गेली होती. आताही ती ट्रोल झाली आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, शिल्पाचा पती अश्लील व्हिडिओ तयार करतो आणि ती मंदिरात जाते हे बाकी अजब आहे. काही युझर्सनं आपली कमेंट करण्याची मर्यादाही ओलांडली आहे. पतीनं अशाप्रकारे काही कृत्य केल्यानंतर ती मंदिरात जाऊन काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अशाप्रकारच्या प्रतिक्रिया तिला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर फडणवीसांचा मोठा संकेत; ‘चर्चेची दारे खुली, कायदेशीर चौकटीत तोडगा काढू’

Panchganga River Incident : रक्षाबंधनाची राखी हातात अन्... बहिणीच्या डोळ्यांदेखतच भावाने पंचगंगा नदीत मारली उडी; रुई पुलावर थरार

NASA Roman: हबलपेक्षा तब्बल 1000 पट वेगवान! नासाची रोमन दुर्बीण अवकाशात; विश्वाच्या गूढ रहस्यांचा घेणार वेध

Marathi News Live Updates : महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; 'या' तीन जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा

Almatti Dam Height Controversy : कोल्हापूर-सांगलीला महापुराचा धोका? आलमट्टीची उंची 524.26 मीटर करण्यास महाराष्ट्राचा तीव्र विरोध; सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार!

SCROLL FOR NEXT