Raj Thackeray Shahrukh Khan Sakal
मनोरंजन

Pathaan Movie : आधी विरोध करणाऱ्या मनसेकडून 'पठाण'चं कौतुक; राज ठाकरेंनी पाठवला पुष्पगुच्छ

राज ठाकरेंनी शाहरुख खानचं कौतुक करत त्याला पुष्पगुच्छ पाठवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटाबद्दल मनसेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे. मनसेने आधी 'पठाण' चित्रपटाला विरोध केला होता. मात्र आता 'पठाण'चं कौतुक करत राज ठाकरे यांनी स्वतः शाहरुख खानला पुष्पगुच्छ पाठवला आहे.

पठाण चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोनला राज ठाकरे यांनी शुभेच्छा संदेश पाठवला आहे. यापूर्वी मनसेकडून पठाण चित्रपटाला विरोध करण्यात येत होता. मात्र आता राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

मनसेने का विरोध केला होता?

'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध केला होता. ‘पठाण’चं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच पाहिजे, नाहीतर मग आम्ही येऊन ‘बांबू’ लावूच शकतो, असं मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT