मनोरंजन

Lata Mangeshkar|'तेव्हा एका १३ वर्षीय मुलीने..'; लतादीदींसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट

ही पोस्ट लिहित राज ठाकरेंनी लतादीदींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

स्वाती वेमूल

गानसम्राज्ञी लता मंगेशकर Lata Mangeshkar यांचा आज (२८ सप्टेंबर) वाढदिवस आहे. लतादीदींनी त्यांच्या आवाजाच्या जादूने सबंध देशाला मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियाद्वारे अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांनीसुद्धा लतादीदींसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, भारतीय गानकोकीळा लतादीदींना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा, असं त्यांनी लिहिलं आहे. लतादीदींचा गायनाचा प्रवास कसा सुरू झाला, याविषयी राज ठाकरेंनी या पोस्टमध्ये लिहिलं. Lata Mangeshkar Birthday

राज ठाकरेंची पोस्ट-

'१९४२ मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा अवघा भारत ब्रिटिशांना उद्देशून 'भारत छोडो'चा नारा देत होता, तेव्हा एका १३ वर्षीय मुलीने भारतीय सिनेसृष्टीत गायिका म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर पुढची अनेक दशकं या गायिकेने आपल्या जादुई आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनोजगतावर राज्य केलं. त्या गायिकेचं नाव लता मंगेशकर. आपल्या सर्वांच्या लता दीदी! दीदींचा आवाज म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारतीयांची स्वप्नं-आशा-आकांशा यांचे प्रतीक आहे. म्हणूनच तर त्यांच्या आवाजाला वय नाही. जात, पंथ, धर्म, भाषा, प्रदेश असे कोणतेही शिक्के नाहीत. दीदींचा आवाज म्हणजे एक निखळ सूर आहे, ज्याचा जन्म जरी वेदनेतून झाला असला तरी त्यात आत्मा आणि परमात्मा यांच्या अद्वैताचा साक्षात्का आहे', अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

लता मंगेशकर यांना त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या भावंडांमध्ये लतादीदी सर्वांत मोठ्या आहेत. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचं शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. १९४२ मध्ये लता मंगेशकर अवघ्या १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. लतादीदींनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जवळपास १ हजारहून अधिक हिंदी सिनेमांची गाणी ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT