rajinikanth 
मनोरंजन

शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत यांना डिस्चार्ज; चाहत्यांसाठी पोस्ट केला फोटो

रजनीकांत यांना गुरुवारी चेन्नईमधील कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

स्वाती वेमूल

सुपरस्टार रजनीकांत Rajinikanth यांना रविवारी चेन्नईमधील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यावर कॅरोटिड आर्टरी रिव्हॅस्कुलरायझेशन सर्जरी करण्यात आली होती. रजनीकांत यांना गुरुवारी कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं वृत्त कळताच जगभरातील चाहत्यांनी चिंता व्यक्त केली होती. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर त्यांनी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. देवघरासमोर प्रार्थना करतानाचा त्यांचा हा फोटो आहे. 'घरी परतलो' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.

नुकतंच रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते दिल्लीला गेले होते. तिथून परतल्यानंतर रुटीन चेकअपसाठी ते गुरुवारी कावेरी रुग्णालयात गेले. काही तपासण्यांनंतर त्यांना २८ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

कावेरी रुग्णालयाने जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटिननुसार, रजनीकांत यांच्यावर कॅरोटिड आर्टरी रिव्हॅस्कुलरायझेशन सर्जरी करण्यात आली. डिसेंबर २०२० मध्ये त्यांना हैदराबादमधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रजनीकांत यांनी तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ४५ वर्षांहून अधिक काळ काम केलं. १९७५ मध्ये त्यांनी के बालचंदर यांच्या अपूर्व रागांगल या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं होतं. ७० वर्षीय रजनीकांत यांनी दाक्षिणात्यसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही दमदार काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT