मनोरंजन

सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी दुसरं लग्न करण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौंदर्या रजनीकांत दुसरं लग्न करण्याच्या तयारीत आहे. तिच्या लग्नाबाबत तिने तसे ट्विट करून सांगितले आहे. रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांतने सांगितले आहे की, ती अभिनेता आणि उद्योगपती विशागन वनंगमुदी सोबत लग्न करणार आहे. येत्या 11 फेब्रुवारीला ती लग्न करणार असल्याची माहिती तिने दिली आहे.

सौंदर्याने ट्विट केले आहे की, 'आता केवळ एक आठवडा राहिला आहे. एका आठवड्यानंतर लग्न असल्याने मी अत्यंत खूश आहे. लग्न विशागन सौंदर्या' अशा आशयाचे ट्विट तिने केले आहे. सौंदर्याचे हे दुसरे लग्न असून सौंदर्याचे याआधी उद्योगपती अश्विन रामकुमार यांच्यासोबत 2010 मध्ये लग्न झाले होते. यानंतर तिने अश्विन रामकुमार यांच्यासोबत 2016 मध्ये घटस्फोट घेतला होता. अश्विन आणि सौंदर्याला वेद नावाचा एक मुलगादेखिल आहे.

ग्राफिक्स डिजाइनर म्हणून सौंदर्याने आपले करिअर केलेले आहे. त्याचबरोबर तिने 'बाबा', 'मजा', 'संदाकोझी' आणि 'शिवाजी' सारख्या चित्रपटातही काम केलेले आहे. त्याचबरोबर तिचा मंगेतर विशागनने 2018 मध्ये तमिळ चित्रपट 'वंजागर उलागम' या चित्रपटापासून आपल्या अभिनयाची सुरवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: सुनील नारायणचं शानदार अर्धशतक; कोलकाता 100 धावा पार

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT