Raju Srivastava health update:'he is critical and in ICU'-AIIMS Director randeep guleria  Google
मनोरंजन

राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी अखेर रुग्णालयाकडून मोठी अपडेट, चिंता वाढली..

एक दिवसापूर्वीच राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय ही बातमी आली असताना रुग्णालयाकडून आलेल्या नवीन अपडेटनं चिंतेत वाढ केली आहे.

प्रणाली मोरे

Raju Srivastava Health Update: लोकांना आपल्या विनोदानं खळखळवून हसवायला लावणारे राजू श्रीवास्तव सध्या जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. कितीतरी दिवसांपासून राजू श्रीवास्तव AIIMS इस्पितळात भरती आहेत. डॉक्टर्स त्यांना बरं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी त्यांची तब्येत कधी गंभीर,कधी सुधारत असल्याच्या बातम्या कानावर पडत आहेत. कालच ते औषधांना प्रतिसाद देत असल्याचं कळालं आणि चाहत्यांचा जीव भांड्यात पडला पण तेवढ्यात आता पुन्हा AIIMS च्या संचालकांनी समोर येऊन त्यांच्या प्रकृतीविषयी अपडेट दिल्यानं पुन्हा सर्व वातावरण गंभीर झालं आहे.(Raju Srivastava health update:'he is critical and in ICU'-AIIMS Director randeep guleria)

AIIMS चे संचालक रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,''राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर अवस्थेत आहे आणि ते सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहेतटट. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की,हा मुद्दा एक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचा वैयक्तिक विषय आहे, यावर आपण इतर कोणत्याही अधिक डिटेल्स सांगू शकत नाही.

राजू श्रीवास्तव यांच्या गंभीर प्रकृतीविषयी ऐकल्यावर त्यांचे चाहते मात्र पुन्हा टेन्शनमध्ये आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी कॉमेडियनच्या प्रकृतीविषयी माहिती देताना राजू यांच्यात सुधारणा होत असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की-''एका वरिष्ठ डॉक्टरांनी राजू यांना तपासलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, त्यांना जे इन्फेक्शन झालं होतं ते आता कमी झालं आहे''.

राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतील सुधारणा झाल्यावर सर्वांनाच हायसे वाटले होते. पण आता पुन्हा राजू श्रीवास्तव यांची तब्येत बिघडल्यानं सर्वच चिंतेत पडले आहेत. त्यांचे चाहते त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थना करत आहेत. राजू यांच्या कुटुंबियांनी देखील त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी पूजा ठेवली होती.

राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एका हॉटेलात जीममध्ये वर्कआऊट करताना ट्रेडमिलवर हृद्यविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर श्रीवास्तव यांना त्वरित AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत रोज चढ-उतार पहायला मिळत आहेत.

राजू श्रीवास्तव यांच्याविषयी बोलयाचं तर त्यांनी आपल्या विनोदानं लोकांचे नेहमीच मनोरंजन केले आहे. कॉमेडियन असण्यासोबतच राजू एक उत्तम अभिनेते देखील आहेत. पण लहानपणापासून कॉमेडी हे त्यांचे पॅशन असल्याने त्यांनी मेहनतीनं त्या क्षेत्रात आपलं नाव कमावलं. त्यांचे फॅन फॉलॉइंगही तगडं आहे. आता ते सगळेच आपल्या लाडक्या कलाकाराच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : मुंबई इंडियन्सची स्वस्तात मस्त डील! रोहित शर्माला तगडा ओपनिंग पार्टनर मिळाला, झाली घरवापसी; चिंता मिटली

Mumbai News: कायदा पोलिसांना लागू नाही का? उच्च न्यायालयाचा सवाल; केंद्राला भूमिका स्पष्‍ट करण्याचे आदेश

IPL 2026 Auction: वेंकटेश अय्यरची किंमत तब्बल १६.७५ कोटींनी झाली कमी! माजी विजेत्यांनी केलं खरेदी

IPL 2026 Auction live : खिशात नाही दाणा अन्... ! Mumbai Indians च्या खेळीने सारे चक्रावले; CSK च्या रणनीतीने KKR चा खिसा कापला...

Latest Marathi News Live Update : विहीरीत पडलेल्या हरणास शेतकऱ्यांनी दिले जीवदान

SCROLL FOR NEXT