Rakhi Sawant
Rakhi Sawant esakal
मनोरंजन

Rakhi Sawant : 'ती बाई घरात सून म्हणून नकोच'! राखीच्या नवऱ्यानं घरच्यांविषयी दिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Sawant : टीव्ही मनोरंजन विश्वात जेव्हा राखीच्या लग्नाची बातमी व्हायरल झाली तेव्हा मोठी खळबळ उडाली. त्याचं झालं असं की, राखीनं तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुराणीशी लग्न केलं. त्याचे फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले. यानंतर वेगळ्याच चर्चेला उधाणही आले.

गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन विश्वाची ड्रामा क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखीच्या वेगवेगळ्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. काल तर राखीला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. तिच्यावर शर्लिन चोप्रानं मानहानीची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यावर राखीनं गंगुबाई काठियावाड मध्ये आलियानं जी पोझ दिली आहे त्याच पोझमध्ये राखीचा फोटो व्हायरल झाला.

Also Read - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

राखीनं आदिलसोबत लग्न केलं हे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्काच बसला. राखीचं हे लग्न तरी खरं आहे ना, असा प्रश्न त्यांना पडला होता. यासगळ्यात आदिलच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहे. पहिल्यांदा त्यानं या लग्नाला विरोध केला होता. आपले लग्न झालेच नाही असे त्यानं म्हटले, त्यानंतर राखीनं पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा क्रिएट केला आणि पुन्हा आदिलची प्रतिक्रिया समोर आली.

आदिलनं आमचं लग्न झालं आहे. आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत, असे म्हणत आदिलनं त्यांच्या लग्नाचे काही फोटोही पोस्ट केले होते. यासगळ्यात पुन्हा आदिलनं त्यांच्या घरच्यांना राखीविषयी काय वाटते याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आदिलच्या कुटूंबियांना पहिल्यापासूनच राखीचा राग आहे. तिचे राहणीमान, तिचे कपडे यानंतर आता लग्न याला त्यांचा विरोध आहे.

आदिलनं एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, माझ्या घरच्यांनी अजुन राखीचा स्विकार केलेला नाही. त्यांना राखी ही सून म्हणून नको आहे. त्यांचा तिच्यावर राग आहे. काही दिवसांपासून राखी आणि आदिल यांच्यातील नाते हे सोशल मीडियावर चर्चेत आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT