Rakhi Sawant Akka Fatima Reaction on hindu dharma esakal
मनोरंजन

Rakhi Sawant : 'हिंदू धर्मात तुला काय वाईट वाटलं?' मुस्लिम धर्म स्विकारलेली राखी म्हणते...

राखीचा तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे. त्यावर आलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत.

युगंधर ताजणे

Rakhi Sawant Akka Fatima Reaction on hindu dharma : टीव्ही मनोरंजन विश्वात नेहमीच आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे चर्चेत राहणारी राखी सावंत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्याचे कारण तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेले वादळ. यामुळे राखीनं आता वाट्टेल ते बोलायला सुरुवात केली आहे. राखीच्या पतीनं तिच्यावर पुन्हा एकदा टोकाचे आरोप करुन खळबळ उडवून दिली आहे.

राखीनं आपल्यासोबत जे काही केले त्या चूकीला माफी नाही. तिनं माझा विश्वासघात केला. ती माझ्याशी खोटं बोलली असे वेगवेगळे आरोप राखीच्या पतीनं तिच्यावर केले होते. यासगळ्यात राखीनं इस्लाम धर्म स्विकारत फातिमा हे नाव धारण केले होते. एक दोन दिवसांपूर्वी राखीला पत्रकारांनी त्यावरुन जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा तिनं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे. राखीचा तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

राखी काही दिवसांपूर्वी मक्का मदिनाला गेली होती. त्यानंतर तिचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यात तिला पत्रकारांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. राखी ही पती आदिल खाननं केलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडताना दिसते आहे. उमराह करुन राखी मुंबई येताच तिला पत्रकारांनी गराडा घातला. त्यात तिला विविध प्रश्न विचारुन बोलते करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राखीनं दिलेली प्रतिक्रिया अनेकांच्या चर्चेचा विषय आहे.

राखी जेव्हा पत्रकारांसमोर आली तेव्हा तिनं आता आपण फातिमा असल्याचे म्हटले. यावेळी एका पत्रकारानं राखीला प्रश्न विचारला की, हिंदू धर्मात तुला काही अडचण होती का राखी? तेव्हा राखी म्हणाली की, हिंदू धर्मात काहीही अडचण नव्हती. पण आता मी मुस्लिम धर्मात लग्न केले आहे. तेव्हा मला त्या धर्माचे नियम पाळणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षांपासून मी आदिलसोबत राहते आहे. तेव्हा हे सगळे नियम, अटी पाळणे महत्वाचे आहे. मी खूपच भाग्यवान आहे की, मला मक्का मदिनावरुन बोलावणं आलं होतं. अशा शब्दांत राखीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

Arvind Kejriwal : ट्रम्प सोडा आता केजरीवालांना सुद्धा हवा नोबेल पुरस्कार! गाजणारा दावा सोशल मीडियावर चर्चेत

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पुण्यात मटण पार्टीसाठी दुकान फोडले मात्र एक चूक आणि चौघे पोलिसांना सापडले

SCROLL FOR NEXT