rakhi sawant first reaction after getting out from police station says my mother is very critical sakal
मनोरंजन

Rakhi Sawant: राखी सुटली! पोलिस ठाण्यातून बाहेर येताच म्हणाली.. माझी अवस्था..

राखी सावंत चौकशी नंतर माध्यमासमोर आली आणि थेट हात जोडले.

नीलेश अडसूळ

rakhi sawant: राखी सावंतचा सध्याचा काळ खराब आहे. असे म्हणणे अजिबात चुकीचे ठरणार नाही. राखीच्या आईच्या प्रकृतीपासून ते पती आदिलने निकाह न स्वीकारण्यापर्यंत 'ड्रामा क्वीन'च्या आयुष्यात रोज नवनवीन नाटकं घडत असतात. पुन्हा एकदा राखी सावंतच्या आयुष्यात एक नवीन संकटात सापडली आहे.

(rakhi sawant first reaction after getting out from police station says my mother is very critical)

खरे तर काही महिन्यांपूर्वी शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी आता कारवाई केली, त्यानंतर पोलिसांनी राखीला ताब्यात घेतले. या अभिनेत्रीची पोलीस ठाण्यात अनेक तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर ती आता आंबोली पोलीस ठाण्यातून बाहेर आली आहे.

हेही वाचा: मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

राखीचा बाहेर येतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राखी सावंत बाहेर आल्यावर म्हणाली, “जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे, तिची प्रकृती ठिक नाही.'

''मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झालाय, मी दिवसभर जेवणही केलेलं नाही,” असं राखीने सांगितलं. आणि राखी एखाद्या राजकीय नेत्यां सारखे हात वर करून निघून गेली यावेळी राखी बुरखा घालून दिसली.

पण दरवेळी प्रत्येक गोष्टीची बातमी मिडीयाला देणारी राखी या वेळी चक्क चुप होती . तिने यावेळी पोलीस चौकशीबाबत कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. नक्की काय खर कारण होतं ? पोलिस काय बोलेले ? पुढे काय राखीने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. चौकशी दरम्यान राखी सावंत तिचा नवरा आदिल खान दुर्रानी बरोबर होती आणि त्या़चा मोबाईल जप्त करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vladimir Putin: युक्रेनला ‘नाटो’प्रमाणे संरक्षणाची हमी; अध्यक्ष पुतीन यांची मान्यता

Raigad Rain Update: रायगड जिल्ह्यात मुसळधार! 'पुराच्या पाण्यात अडकलेल्या 30 नागरिकांची सुटका'; पहाटे 3 वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन

राज्यात पुढील २४ तास धोक्याचे! मुंबई पुण्यासह कोकणात अती मुसळधार पावसाची शक्यता, बाहेर जाणं टाळा

Mumbai Flood Alert: बापरे! मुंबईत महापूर येणार? मिठी नदीने गाठली धोक्याची पातळी, कुर्ल्यातील निवासी भागात पाणी, व्हिडिओ पाहा

Mumbai-Pune Latest Rain Live Updates Maharashtra : मुंबईत अजूनही पाऊस सुरूच, आज सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला

SCROLL FOR NEXT