Ranbir Kapoor News 
मनोरंजन

Ramayan Movie Update: रणबीरच्या 'रामायण' चित्रपटाविषयी आली मोठी अपडेट एक दोन नव्हे तर तब्बल....

गेल्या काही दिवसांपासून रणबीरच्या रामायणावर आधारित चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दित आहे.

युगंधर ताजणे

Ranbir Kapoor Ramayan movie : रणबीर कपूर, जान्हवी कपूर आणि यश यांची आगामी फिल्म रामायण ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. दंगल चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी हे करणार आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सुत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की, हा चित्रपट तीन भागातून उलगडला जाणार आहे.

बॉलीवूडमधील एक महत्वकांक्षी प्रोजेक्ट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाते. त्यात रणबीर कपूर, जान्हवी कपूर, यश हे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच बिग बी अमिताभ बच्चन यांचेही नाव समोर येत आहे. अद्याप याबाबत मेकर्सकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

बॉलीवूड हंगामानं दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक भागातून रामायणाविषयीची माहिती समोर येणार आहे. डिटेलिंग पार्टमधून ही स्टोरी प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार आहे. पहिल्या भागात भगवान राम, अयोध्यातील त्यांचा परिवार, सीताविवाह आणि त्यांचा १४ वर्षांचा वनवास असा प्रवास असेल.रावणद्वारे सीता हरण यात पहिला भाग संपेल.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या भागामध्ये भगवान राम आणि लक्ष्मण यांची होणारी भेट हे दाखवले जाणार आहे. भगवान हनुमान, वानर सेना आणि त्यांच्या समोर येणारी संकटं तसेच राम यांनी निर्माण केलेला रामसेतू हे दाखवले जाणार आहे. तसेच तिसऱ्या भागामध्ये वानर सेना आणि रावण सेना यांच्यातील युद्धाचे प्रसंग दाखवले जाणार आहेत. आता त्याचीही चर्चा होताना दिसत असून त्याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

मात्र या सगळ्यात मेकर्सकडून कोणत्याही प्रकारची अधिकृतपणे माहिती समोर आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामनवमीच्या निमित्तानं चित्रपटाची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT