Ranbir Kapoor,Sanjay Leela Bhansali
Ranbir Kapoor,Sanjay Leela Bhansali Google
मनोरंजन

रणबीर कपूरनं संजय लीला भन्साळीं विरोधात केलं मोठं वक्तव्य;तो म्हणाला...

प्रणाली मोरे

संजय लीला भन्साळींच्या सिनेमाचा तामझाम पाहताना डोळे दिपले नाहीत तर नवलंच. सिनेमाचं कथानक,निर्मिती,दिग्दर्शन,गाणी,संगीत अशा सगळ्याची जबाबदारी आपल्या एकट्याच्या खांद्यावर पेलत सिनेमा बॉक्सऑफिसवर हीट करण्यात संजय लीला भन्साळींचा हातखंडा. त्यांनी अनेकांना रातोरात स्टार केलंय. तर अनेक स्टार्समधली लव्ह केमिस्ट्रीही त्यांच्या सिनेमाच्या सेटवरच रंगलीय. प्रेक्षकांना आपल्या सिनेमाच्या माध्यमातनं झगमगणा-या स्वप्नांच्या नगरीत सहज फिरवून आणण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकणार नाही. त्यांच्या सिनेमांनी अनेक प्रेमकथांना जन्म दिला.

'हम दिल दे चुके सनम','सॉंवरिया','देवदास','खामोशी','रामलीला','सॉंवरिया','पद्मावत','ब्लॅक' अशा त्यांच्या अनेक सिनेमांनी रेकॉर्ड केलाय. रणवीर सिंग,दिपिका पदुकोण,रणबीर कपूर,सोनम कपूर,ऐश्वर्या राय-बच्चन अशा कलाकारांना बॉलीवूडमध्ये सक्सेस चाखायला मिळाला तो संजय लीला भन्साळींमुळेच. पण असं सगळं असताना रणबीर कपूरसोबत असं काय बिघडलं की त्याने थेट आपल्या बॉलीवूडमधल्या 'गुरू' शीच पंगा घेतला. रणबीर कपूर त्याच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्तानं एका कार्यक्रमास गेला होता. तिथं बोलताना त्याने संजय लीला भन्साळीं विरोधात जाऊन काही अशी वक्तव्य करायला सुरुवात केली की सगळयांना वाटलं रणबीर आणि भन्साळींमध्ये वादाची ठिणगी पेटली म्हणायची.

रणबीरला त्याच्या बॉलीवूडमधल्या सुरुवातीच्या दिवसांविषयी प्रश्न विचारले असता तो बोलला,''मी माझी सुरुवात संजय लीला भन्साळींच्या 'ब्लॅक' सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली. त्यावेळी मला स्टार कीडची कोणतीही ट्रीटमेंट दिली गेली नाही. उलट काही चुकलं तर संजयजी डाफरायचे,ओरडायचे,तासनतास उभं करून ठेवायचे,प्रसंगी एखादा फटकाही पाठीवर मिळायचा. मी त्यांच्याकडे काम करताना खूप सहन केलंय हे सगळं. पण मला माहीत होतं, ते जे करतायत ते माझ्या चांगल्यासाठी करतायत. मला या सगळ्या गोष्टींचा अनुभव देऊन ते स्ट्रॉंग बनवतायत याची मला जाणीव होती. म्हणून मला त्या गोष्टींचा कधी त्रास झाला नाही. आज मी जे काही आहे ते त्या शिकवणुकीमुळे. सुरुवातीला संजयजींबद्दल हा काय बोलतोय,काय वाद ओढवून घेतोय असं वाटणा-यांना रणबीरच्या वक्तव्याचा शेवट ऐकताना मात्र भारावल्यासारखं झालं. असो,रणबीरने संजय भन्साळीं विरोधात तक्रारींचा पाढा वाचला खरा, पण त्यानं आपलं भलं झालं असंही पुढे म्हटलं. म्हणून आता भविष्यात दोघं लवकरच एखादा सिनेमा एकत्र करतील अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT