Deepika Padukone And
Deepika Padukone And  eSakal
मनोरंजन

Deepika Padukone: दीपिका होणार आई? 'त्या' व्हिडीओमुळे चर्चेला उधाण

priyanka kulkarni

Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हे दोघे बॉलिवूडमधील पॉवर कपल म्हणून ओळखले जातात. रणवीर आणि दीपिका हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता दीपिका आणि रणवीर हे लवकरच आई-बाबा होणार आहेत, असं म्हटलं जात आहे. एका व्हिडीओमुळे दीपिकाच्या प्रेग्नन्सीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

दीपिकाचा व्हिडीओ व्हायरल

दीपिका पदुकोणने बाफ्टा फिल्म अवॉर्ड्स सोहळ्यात हजेरी लावली. यादरम्यान, दीपिकानं सब्यसाची मुखर्जीनं डिझाइन केलेली गोल्डन शिमरी साडी परिधान केली होती.बाफ्टा फिल्म अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवरील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यामध्ये दीपिका ही तिचा बेबी बंप लपवताना दिसत आहे, असं नेटकऱ्यांचे मत आहे. पण दीपिका पदुकोण किंवा रणवीर सिंहनं अजून याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

पाहा व्हिडीओ:

दीपिकाच्या प्रेग्नन्सीची चर्चा (Deepika Padukone Pregnancy News)

बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातील दीपिकाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्या प्रेग्नन्सीची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागली. द वीकच्या रिपोर्टमध्ये दीपिका पदुकोण गर्भवती असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी देखील दीपिकाच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा सोशल मीडियावर झाली. 'फायटर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिकाच्या प्रेग्नन्सीची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. मात्र, यावर दीपिका किंवा रणवीरने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी दीपिका एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती, "रणवीर आणि मला लहान मुले खूप आवडतात. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत जेव्हा आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याची एन्ट्री होईल."

दीपिकाचे आगामी चित्रपट (Deepika Padukone Upcoming Movies)

दीपिकाचा फायटर हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटातील हृतिक रोशन आणि दीपिका यांच्या केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. आता 'सिंघम अगेन' आणि 'कल्कि 2989 AD' या दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT