Ranveer Singh Deepika Padukone visits Golden Temple Amritsar on their anniversary
Ranveer Singh Deepika Padukone visits Golden Temple Amritsar on their anniversary 
मनोरंजन

क्यूट कपल पोहोचलं सुवर्ण मंदिरात!

सकाळ डिजिटल टीम

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांच्या काल एक वर्षं पूर्ण झाला. त्यांच्या अॅनिव्हर्सरीनिमित्त ते सध्या देवदर्शन करत आहेत. आज (ता. 15) पहाटेच ते दोघे अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात पोहोचले असून, सकाळी सकाळी त्यांनी डोकं टेकवून दर्शन घेतले. 

दीपवीरच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस कसा साजरा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. दोघांनी काल कुटूंबियांसह तिरुमल्ला तिरुपतीचे दर्शन घेतले, तर आज ते सुवर्णमंदिरात गेले आहेत. दीपिका दाक्षिणात्या असल्याने त्यांनी प्रथम तिरूपतीचे दर्शन घेतले, तर पंजाबी रणवीरसाठी ते आज सुवर्णमंदिरात पोहोचले. 

दीपिका रणवीर मागच्याच वर्षी लग्नाच्या बेडीत अडकले, त्यांच्या लग्नाचा हा पहिलाच वाढदिवस. कालही ते दोघे नवविवाहीत जोडप्यासारखे सजले होते. तर आजही दोघं खूप सुंदर दिसत होते. दीपिका चॉकलेटी रंगाच्या पंजाबी सूटमध्ये तर रणवीर ग्रे रंगाच्या शेरवानीमध्ये खुलून दिसत होता. 

लग्नाच्या वाढदिवसाची सुरवातच या जोडीने देवाचे दर्शन घेऊन सुरू केली. हे दोघे थेट तिरूपतीला पोहोचले. तिरूमल्लाला जाऊन त्या दोघांनी सकाळी सकाळी तिरूपतीचे दर्शन घेतले. यावेळी दोघांचे कुटूंबियही त्यांच्यासोबत होते. दरेशनावेळी या दोघांनी पुन्हा एकदा नवविवाहित दाम्पत्यासारखा पेहराव केला होता. याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणात ट्विस्ट, दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक हनी बाबू यांनी मागे घेतला जामीन अर्ज

Bollywood News: व्हॅनिटी व्हॅन, स्टायलिस्ट अन् भरमसाठ फी! फिल्मस्टारवर एका दिवसाला किती पैसे होतात खर्च? वाचून व्हाल थक्क

Video: मुलं आजूबाजूला खेळतायेत अन् कपल्सचा पार्कच्या मधोमध 'रोमान्स'; व्हिडिओ पाहून लोकांचा संताप

Latest Marathi News Live Update : स्मृती इरानी यांच्या विरोधात काँग्रेस नेत्याचा अर्ज दाखल

Health Insurance: विमा घेऊनही चिंता कायम! 43 टक्के पॉलिसी धारकांना मिळत नाही क्लेम; धक्कादायक अहवाल समोर

SCROLL FOR NEXT