Raveena Tandon,Sanjay Dutt
Raveena Tandon,Sanjay Dutt Google
मनोरंजन

रविना अन् संजय 'तो' सीन करायला उत्सुक होते पण दिग्दर्शक म्हणाला...

प्रणाली मोरे

'९०' सालातील सुंदर आणि हॉट अभिनेत्रींमध्ये रविना टंडनचं(Raveena Tandon) नाव नक्कीच घ्यायला हवं. तिनं बॉलीवूडमधल्या अनेक बड्या स्टार्ससोबत काम केलंय. पण अक्षयकुमार सोबत 'मोहरा' सिनेमात पिवळी साडी नेसून पावसात ओलीचिंब होऊन नृत्य करणारी रविना चाहत्यांना अधिक भावली. आजही 'सुर्यवंशी' सिनेमात कतरिना सारख्या हॉट ब्युटीनं 'टीप टीप बरसा पानी' वर केलेलं नृत्य पाहून चाहत्यांना रविनाच बेस्ट वाटली. अर्थात ती रविनाची जादू म्हणायची. रविना नुकतीच आपल्याला तिच्या 'अरण्यक' या वेब सिरीजमध्ये पहायला मिळाली. त्यात तिनं साकारलेली पोलिस ऑफिसर लोकांना आवडली आहे. तिच्या सिरीजलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

रविनाकडे आता एका कन्नड सिनेमातही दिसणार आहे. ज्याचं दिग्दर्शन प्रशांत नील करीत आहे. सिनेमाचं नाव 'KGF 2' आहे. या सिनेमात रविनाचा 'विजेता' सिनेमातला तिचा आवडता सहकलाकार संजय दत्तही खलनायकाच्या भूमिकेत आहे. अभिनेता यश या सिनेमाचा हिरो आहे. पण रविना मात्र आपल्या या सिनेमाच्या स्क्रिप्टवर थोडी नाराज आहे. अहं..स्क्रिप्ट चांगलं नाही हा विषयच नाही इथे. तर या सिनेमात संजय दत्त आणि ती एकत्र काम करीत असूनही तिला त्याच्यासोबत एकही सीन करता येणार नाही म्हणून तिनं थेट दिग्दर्शकाकडे नाराजी व्यक्त केलीय. बरं तिनेच नाही तर संजयनेही स्क्रिप्ट मध्ये थोडा बदल करून जर रविनासोबत सीन एखादा ठेवता आला तर ठेवावा असं दिग्दर्शकाला भेटून सांगितलं अशी बातमीही आहे. पण दिग्दर्शकानं मात्र असं करण्याला नकार दिला. कथेची गरजच नाही तुम्ही दोघं एकत्र दिसण्याची तर मी ते का करू असं त्या दोघांना सुनावलं.

Raveena Tandon ,Sanjay Dutt

यावरून रविना,संजय थोडे खट्टू झाले पण इलाज नव्हता. रविना आणि संजयने 'जीना मरना तेरे संग','क्षत्रिय','जमाने से क्या डरना','विजेता' आणि 'जंग' अशा अनेक सिनेमातून एकत्र काम केलेले आहे. त्यांची जोडीही पडद्यावर छान दिसलेली. त्यावेळी काम केल्यामुळे संजयसोबत कम्फर्ट झोन होताच,पण पुन्हा एकत्र काम करताना पहिल्यासारखी धम्माल अनुभवयाची होती ती आता अनुभवता येणार नाही असं रविनानं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीतनं सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT