सापडलं! सलमानचं नवं प्रेम;या तेलगु अभिनेत्रीचं नाव आलं समोर

२२ जानेवारीला कळणार सत्य,स्वतः दबंग खान सांगणार ...
Salman Khan,Pragya Jaiswal
Salman Khan,Pragya JaiswalGoogle

सलमान खान(Salman Khan) लग्न कधी करणार? या प्रश्नाचा गुंता आजतागायत काही सुटायचं नाव घेत नाही. आता इतक्या हॅंडसम माणसाचं लग्न राहूच कसं शकतं बरं हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न. मोठ्या खानदानातला,कुंटुंबप्रिय,सुपरस्टार,पैसेवाला अशी सारी बिरुदं नावासोबत मिरवणाऱ्या सलमानच्या नशिबी सिंगल राहणं कसं काय आलं बुवा आजही कोणाला कळलं नाही. पण याचं त्याला काहीच दुःख नाहीय. आणि कसं असणार बरं. इतक्या सुंदर सुंदर गर्लफ्रेंड्स आयुष्यात पुढे-मागे करीत असताना त्याला कशाला काळजी करायची गरज आहे. आता-आतापर्यंत त्याची सध्याची गर्लफ्रेड परदेशी मॉडेल-अ्ॅक्ट्रेस आहे ही बातमी सर्वप्रचलित असताना नवीन खबर कानावर पडलीय. ते म्हणजे सलमान आता तेलगु अभिनेत्री प्रग्या जयसवालसोबत रोमान्स करतोय असं म्हटलं जातंय. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर वाचा.

Salman Khan,Pragya Jaiswal
अमेरिकेत ओमीक्रॉन वाढतोय; ६४ वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा आता 'या' तारखेला

२०२२ या नवीन वर्षात सलमान आता एक नवीन सिंगल गाण्याच्या माध्यमातून रोमॅंटिक अंदाजात आपल्याला दिसणार आहे. यासाठी भूषण कुमार आणि सलमान खान एकत्र आले आहेत. सलमान खान फिल्म्स आणि टी-सीरीज मिळून 'मै चला' हे सिंगल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. या गाण्याचं वैशिष्ट्य असं आहे की सलमान स्वतः या गाण्यावर परफॉर्म करताना दिसणार आहे. तर त्याच्यासोबत तेलगु अभिनेत्री प्रग्या जयसवाल दिसणार आहे. तर हे सलमानचं कोणतंही नवीन प्रेम प्रकरण नाही तर नवीन रोमॅंटिक सॉंग प्रकरण आहे बरं. या गाण्यासाठी युलिया वंतूर आणि गुरू रंधावानं आवाज दिलेला आहे. हे दोन्ही गायक पहिल्यांदाच 'मै चला' या गाण्यासाठी एकत्र आले आहेत. हे एक रोमॅंटिक गाणं आहे. शबीना खान आणि दिग्दर्शक गिफ्टीनं या गाण्याला दिग्दर्शनाच्या माध्यमातून चारचॉंद लावल्याचं बोललं जातंय.

Salman Khan,Pragya Jaiswal
'जैसा बाप,वैसी बेटी';कपिलच्या 'ड्रमर' मुलीवर चाहते फिदा

असं म्हटलं जातंय की सलमान खानच्या चाहत्यांसाठी हे गाणं म्हणजे एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे. हे गाणं शब्बीर अहमदनं लिहिलंय आणि संगीतही त्यानंच दिलंय. हे गाणं २२ जानेवारीला टी-सीरीजच्या यु ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित केलं जाणार आहे. युलिया वंतूर सोबत आपली गाणं गातानाची जुगलबंदी चांगलीच रंगलीय असं गुरु रंधावानं सांगितलय. युलियाचीही त्यानं गायक म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून भरभरून तारिफ केलीय. तर इकडे युलियानं देखील गुरुसोबत गाण्याचा अनुभव अफलातून होता असं म्हटलंय. आम्ही दोघांनीही गाण्यात आमचा आत्मा उतरवलाय असं तिनं नमूद केलं. आता कधी गाणं प्रदर्शित होतंय आणि सलमान-प्रग्याची रोमॅंटिक केमिस्ट्री चाहत्यांना किती भुरळ घालतेय हे लवकरच कळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com