Ravindra Mahajani Sakal
मनोरंजन

Ravindra Mahajani: ‘मराठीतला हँडसम हंक’ मुंबईत टॅक्सी चालवायचा; नातेवाईकांनीही फिरवली होती पाठ

रविंद्र महाजनी यांचा मृतदेह त्यांच्या भाड्याच्या घरामध्ये आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन तीन दिवस पूर्वीच झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

वैष्णवी कारंजकर

मराठी चित्रपटसृष्टी गाजवलेला लाखो मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा हँडसम चेहरा म्हणजे रविंद्र महाजनी. मराठीतल्या या चॉकलेट हिरोचा करुण अंत झाल्याचं आज समोर आलं. त्यांच्या भाड्याच्या घरामध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन तीन दिवस पूर्वीच झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

तळेगाव दाभाडे इथल्या आंबी इथं रविंद्र महाजनी भाड्याने फ्लॅट घेऊन एकटेच राहत होते. गेल्या सात आठ महिन्यांपासून ते इथे राहत होते. त्यांच्या घराचा दरवाजा दोन तीन दिवसांपासून उघडला गेला नव्हता. तसंच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं.

तेव्हा पोलिस आले आणि दार उघडलं असताना रविंद्र महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. त्यांचा मृत्यू दोन तीन दिवसांपूर्वीच झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांचा मुलगा आणि अभिनेता गश्मीर महाजनी यांना याबद्दल माहिती कळवण्यात आली असून पोस्ट मार्टमनंतर मृत्यूचं कारण समोर येईल. 

स्ट्रगलच्या काळात टॅक्सीही चालवली

शाळेत असल्यापासूनच रविंद्र महाजनी यांना अभिनयाची आवड होती, ते शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागही घ्यायचे. त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. पण दरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने घरची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यामुळे नोकरी करण्याची, पैसे कमावण्याची गरज होती. म्हणून त्यांनी टॅक्सी चालवायचं ठरवलं. दिवसा ते काम मिळवण्यासाठी निर्मात्यांकडे जायचे आणि रात्री टॅक्सी चालवून पैसे कमवायचे.

मोठ्या संपादकांचा मुलगा टॅक्सी चालवतो, म्हणून नातेवाईकांनीही पाठ फिरवली होती. पुढे त्यांनी मधुसुदन कालेलकर यांच्या नाटकात काम केलं. या जाणता अजाणता या नाटकातून त्यांना पुढे कामं मिळत गेली आणि झुंज या चित्रपटामुळे रविंद्र महाजनी लाईमलाईटमध्ये आले आणि अभिनय क्षेत्रातल्या दैदिप्यमान कामगिरीला सुरुवात झाली.

पुढे त्यांनी लक्ष्मी, देवता, मुंबईचा फौजदार, हळदी कुंकू, गोंधळात गोंधळ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पुढे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काम करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यांनी आपला मुलगा गश्मीर याच्यासोबत देऊळ बंद या चित्रपटातही काम केलं. अशा गुणी अभिनेत्याचा करुण अंत रसिकांच्या जीवाला चटका लावून जाणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला शीतल तेजवानीचा जबाब

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT