Rekha On Vogue Arabia Cover Page Esakal
मनोरंजन

Rekha On Vogue Arabia: वयाची सत्तरी गाठणारी रेखा चमकली इंटरनॅशनल मॅगझीनवर! चित्रपटात काम का करत नाही विचारल्यावर म्हणते,

Vaishali Patil

Rekha On Vogue Arabia Cover Page: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांची वेगळी ओळख सांगायची गरज नाही. त्यात अभिनय, त्याचेसौंदर्यांचे लोक अजूनही वेडे आहेत.

आता जरी रेखा अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसत नसल्या तरी त्या आजही त्यांच्या ग्लॅमरस लुक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात.

बॉलिवूडच्या अनेक पार्टी आणि कार्यक्रमात त्या सहभागी होतात आणि आपल्या सौंदर्याची भुरळ अजूनही तिच्या चाहत्यांना पडते. ती नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

बॉलिवूडची आयकॉन मानल्या जाणाऱ्या रेखा या अलीकडेच एका आंतरराष्ट्रीय मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसल्या. 68 वर्षांच्या रेखा यांचा फिटनेस उत्कृष्ट आहे.

आताही त्यांनी पुन्हा एकदा ते सिद्ध केले आहे. वोग अरेबियाच्या कव्हर पेजवर रेखा दिसल्या. यात त्या अनेक वेगवेगळअया लुकमध्ये दिसल्या. विशेष म्हणजे रेखा कव्हर पेजवरील एका फोटोमध्ये त्यांनी सिंदूरही लावला आहे.

या फोटोशुटवेळी रेखा यांनी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझायनर साडी परिधान केली होती.वोग अरेबियाने या कव्हर शूटमधील अनेक फोटो आपल्या पेजवर शेअर केली आहेत.

मॅगझिनच्या अधिकृत हँडलने रेखाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चित्रांमध्ये रेखा काळ्या रंगाच्या टर्टलनेक ब्लाउजमध्ये शाही अंदाजात दिसत आहे. त्यांनी हेडगियर घातलेले दिसते जे शाही त्यांच्या शाही सौंदर्यात भर घालते. दुसर्‍या फोटोत रेखाने गोल्डन बॉर्डर असलेला दुपट्टा अनारकली आणि दागिने घातले आहे. त्यांचा प्रत्येक लूक आयकॉनिक आहे

अभिनेत्रीच्या फोटोशूटने जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर, करण जोहर आणि इतर अनेक सेलिब्रिटींना आश्चर्यचकित केले.

यावेळी रेखा यांनी वोग अरेबियाला मुलाखतही दिली ज्यात त्यांनी 2014 पासून कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलेले नाही. हे विचारल्यावर सांगितले की, "मी चित्रपट केलेत किंवा नाही केलेत तरीही ते मला सोडणार नाही. मला ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासोबत माझ्या आठवणी पुन्हा जगायच्या आहेत. जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा योग्य प्रोजेक्ट मला सापडेल. माझं व्यक्तिमत्त्व माझं स्वतःचं आहे, पण माझं सिनेमॅटिक व्यक्तिमत्त्व पाहणाऱ्याच्या नजरेत आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT