lukachupi
lukachupi 
मनोरंजन

लुका छुपी : सिच्युएशनल कॉमेडी!

सकाळवृत्तसेवा

लग्न... लिव्ह इन रिलेशनशिप... याबद्दल आजच्या तरुण पिढीचे वेगवेगळे विचार आहेत. आजची तरुण पिढी आपला जीवन साथीदार निवडताना खूपच चोखंदळ आहे. केवळ एकमेकांना पसंत आहे म्हणून लग्न करायचे नाही; तर एकमेकांचा स्वभाव... एकमेकांचे गुण-अवगुण; तसेच एकमेकांची मने तितकीच जुळणे आवश्‍यक आहे. याबाबतीत आजची तरुण पिढी खूप विचार करते आणि मगच पुढचे पाऊल टाकते. आज लिव इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली असली, तरी लग्न या पवित्र बंधनावर सगळ्यांचा विश्‍वास आहे. "लुका छुपी' या चित्रपटात हेच अधोरेखित केले आहे.

दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकत्र येतात... त्यांचे विचार वेगवेगळे असतात आणि मग कशी धमाल उडते हे या चित्रपटात गमतीशीर आणि हसत-खेळत मांडण्यात आले आहे. या चित्रपटाची कथा मथुरा या शहरात घडणारी आहे. गुड्डू (कार्तिक आर्यन) हा एक टीव्ही रिपोर्टर असतो. पहिल्यांदा प्रेम आणि त्यानंतर लग्न यावर त्याचा विश्‍वास असतो. रश्‍मी (क्रिती सेनन) ही गुड्डूच्याच चॅनेलमध्ये इंटर्नशिप करायला दिल्लीहून आलेली असते. तिचे विचार काहीसे वेगळे असतात. प्रेम आणि नंतर लग्न करायचे असल्यास एकमेकाला अधिक जाणून घेण्यासाठी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणे आवश्‍यक आहे... एकमेकाला अधिक पारखून घेणे आवश्‍यक आहे... असे तिचे विचार असतात. रश्‍मीचे वडील (विनय पाठक) अत्यंत कठोर. लिव्ह इन रिलेशनशिपच्या ते अत्यंत विरोधात असतात. वडिलांचा स्वभाव माहीत असतानाही रश्‍मी पत्रकार गुड्डूच्या (कार्तिक आर्यन) प्रेमात पडते. त्यानंतर दोघंही लग्न करण्याचा निर्णय घेतात. गुड्डूही लगेचच लग्न करण्यास तयार होतो. मात्र लग्नाआधीच एकमेकांना पुरेसं ओळखता यावं म्हणून रश्‍मी लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडते. पण हा पर्याय योग्य की अयोग्य? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचं की नाही, या संभ्रमात रश्‍मी-गुड्डू असतानाच या दोघांचा मित्र अब्बास (अपारशक्ती खुराना) त्यांच्या मदतीला धावतो. मात्र अब्बासची मदत या दोघांना फायदेशीर न ठरता तो रश्‍मी-गुड्डूच्या आयुष्यात आणखीनच गोंधळ निर्माण करतो.

रश्‍मी-गुड्डू अखेरीस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. पण गुड्डूचे कुटुंबीय या दोघांना नवरा-बायको म्हणून घरी घेऊन येतात. मग रश्‍मी-गुड्डूची कशी तारांबळ उडते हे या चित्रपटात दाखवले आहे. लक्ष्मण उतेकरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. यापूर्वी त्याने "टपाल' आणि "लालबागची राणी' हे दोन मराठी चित्रपट दिग्दर्शित केले होते. हिंदीमध्ये "इंग्लिश विंग्लिश', "हिंदी मीडियम' अशा काही चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा त्याचा हा पहिलाच प्रयत्न आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने आपली चांगली छाप उमटविली आहे. कथेचा पोत नाजूक असतानाही त्याला चांगली फोडणी देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. सहाजिकच कलाकारांच्या अभिनयाची उत्तम साथ लाभली आहे.

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन ही जोडी छान आणि सुरेख दिसली आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री किती उत्तम आहे हे निश्‍चितच जाणवते. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि भोळेपणा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी छान टिपला आहे. या दोन कलाकारांबरोबर सहायक कलाकार पंकज त्रिपाठी, विनय पाठक, अपारशक्ती खुराना या कलाकारांची कामगिरीही दमदार झाली आहे. पंकज त्रिपाठीने बाबुलालची व्यक्तिरेखा साकारली आहे. ही व्यक्तिरेखा चित्रपटात एकच धमाल उडवते. अपारशक्ती खुराना यांनी साकारलेली अब्बासची व्यक्तिरेखा निश्‍चित लक्षात राहण्यासारखी आहे. चित्रपटातील संगीत ऐकण्यासारखे झाले आहे. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम. चित्रपटाचा पूर्वार्ध संथ आहे. मात्र उत्तरार्धात चांगलीच गंमत निर्माण होते. हा चित्रपट म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी आहे. अत्यंत गमतीशीर आणि रंगतदार झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT