प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यात मुंबई उच्च न्यायालयानं रियाला दिलासा दिला आहे. रियाच्या परदेशवारीवर निर्बंध घालण्यात आले होते. यापुढील काळात रियाला परदेशात जाता येणार असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंदी असणार नाही. असे कोर्टानं सांगितले आहे.
बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणानंतर रिया ही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. तिची वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी देखील चौकशी केली आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयकडून रियाच्या विरोधात लूक आऊट नोटीस जाहीर करण्यात आली होती. त्यात तिला परदेशी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यावर हायकोर्टानं तिला दिलासा दिला आहे.
रियानं मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयच्या लूक आऊट नोटीशीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. त्यात तिनं आपल्याला परदेशी प्रवास करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी मागणी तिनं कोर्टाकडे केली होती. कोर्टानं आता तिला परदेश प्रवासासाठी परवानगी दिली आहे. यामुळे रियाला दुबईतील एका ब्रँडच्या इव्हेंटसाठी जाता येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोर्टानं रियाला २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान विदेश यात्रा करण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या लूक आऊट नोटीशीमुळे रिया ही अडचणीत सापडली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.