Rinku Rajguru latest news esakal
मनोरंजन

Rinku Rajguru Viral Video : 'तुमच्या मुलीला जर...' रिंकू एवढी का संतापली, नेमकं घडलं काय?

रिंकुनं (Rinku Rajguru viral video) तिला धक्काबुक्की करणाऱ्यांना चांगलेच सुनावल्याचे दिसून आले आहे.

युगंधर ताजणे

Rinku Rajguru actress Viral Video : सैराट मध्ये आर्चीच्या भूमिकेत दिसलेल्या रिंकु राजगुरुला आता सारा महाराष्ट्र प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखू लागला आहे. तिच्या नावाची क्रेझ काही औरच आहे. सोशल मीडियावर तिचा चाहतावर्ग मोठा आहे.तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

आता रिंकु ही एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. जळगावमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं सहभागी झालेल्या रिंकुला धक्काबुक्की करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंबंधी एका मराठी वृत्त वाहिनीनं व्हिडिओ व्हायरल केला आहे. रिंकु येणार असे कळताच तिला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

गर्दीतील काही जणांनी रिंकुला धक्काबुक्की केली. त्यानंतर चिडलेल्या रिंकुनं त्या व्यक्तींना सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिंकु म्हणते की, तुमच्या मुलीला जर अशी कुणी धक्काबुक्की केली तर चालेल का, रिंकुनं तिला धक्का बुक्की करणाऱ्यांना अशाप्रकारे समज दिली आहे. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.

रिंकुच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाल्यास, सैराटनंतर रिंकुनं वेगवेगळ्या मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. वेबसीरिजमध्ये देखील ती चमकली होती. हेमंत ढोणेच्या झिम्मा २ मध्ये रिंकुनं साकारलेली भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार रिंकु ही जळगावातील महासांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाली होती. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर तिला चाहत्यांकडून धक्काबुक्कीला सामोरं जावं लागलं. यावर ती चांगलीच चिडल्याचे दिसून आले. यावेळी तिनं त्या धक्काबुक्की करणाऱ्यांना उद्देशून याठिकाणी तुमची मुलगी असती तर चाललं असतं का, अशा शब्दांत आपला राग व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

इलॉन मस्कने पुन्हा एकदा जगाला केलं शॉक! Wikipedia ला टक्कर देणार Grokipedia, कोणतं आहे बेस्ट? पाहा एका क्लिकवर

"तर आमची मैत्री तुटेल..." राज ठाकरेंसोबत सिनेमा बनवण्यावर महेश मांजरेकरांनी मांडलं मत; म्हणाले..

Latest Marathi News Live Update : हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा पक्ष प्रवेश सोहळा

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

SCROLL FOR NEXT