Rinku Rajguru esakal
मनोरंजन

Rinku Rajguru: "माझा हात खेचल्यामुळे..."; जळगावमधील कार्यक्रमाबाबत रिंकूनं शेअर केली पोस्ट

Rinku Rajguru: रिंकूनं एक पोस्ट शेअर करुन जळगावमधील कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली आहे.

priyanka kulkarni

Rinku Rajguru: सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुनं (Rinku Rajguru) काही दिवसांपूर्वी जळगावातील (Jalgaon) महासांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात रिंकूला गर्दीतील काही लोकांनी धक्काबुक्की केली आणि त्यानंतर चिडलेली रिंकू प्रेक्षकांना ओरडली, अशी चर्चा होऊ लागली. अशातच आता रिंकूनं एक पोस्ट शेअर करुन या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.

रिंकूनं शेअर केली पोस्ट

रिंकूनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा बातम्या प्रसादमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमाठिकाणी अशी कोणतीच घटना झाली नसून माझा हात खेचल्यामुळे एका Representative शी मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास आणि प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती, तुमची रिंकू". रिंकूच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Rinku Rajguru

रिंकू ही जळगावमधील कार्यक्रमातील प्रेक्षकांवर ओरडली, असं म्हटलं जात होतं. "तुमच्या मुलीला जर अशी कुणी धक्काबुक्की केली तर चालेल का?", असं रिंकूनं चाहत्यांना जाब विचारलं असं म्हटलं जात होतं. पण आता रिंकूनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट शेअर करुन हे स्पष्ट केलं आहे की, जळगावमधील कार्यक्रमात ती चाहत्यांवर ओरडली नाही.

रिंकूचे चित्रपट

रिंकूला सैराट या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सैराटनंतर रिंकुनं मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. मेकअप, झुंड या चित्रपटांमधून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला आली. रिंकू ही वेबसीरिजमध्ये देखील काम केलं आहे. हॉटस्टारवरील हंड्रेड या वेब सीरिजमधील रिंकूच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. रिंकूचा झिम्मा २ हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी रिलीज झाला.

सोशल मीडियावर देखील रिंकूची क्रेझ

सोशल मीडियावर देखील रिंकूची क्रेझ आहे. रिंकू सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. रिंकूच्या फोटोंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT